पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षेत आदित्य श्रीवास्तवने देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. अनिमेष प्रधान द्वितीय, दोनुरू अनन्या रेड्डी हिने तृतीय क्रमांक मिळवला. राज्यातील अनेक उमेदवारांनी यशाचा झेंडा फडकवला असला तरी पहिल्या शंभरांत स्थान मिळवणाऱ्या मराठी उमेदवारांची संख्या यंदा रोडावल्याचे चित्र आहे.

नागरी सेवा परीक्षा २०२३च्या मुलाखती जानेवारी ते एप्रिल या कालावधीत घेण्यात आल्या. यंदा एक हजार १६ उमेदवार शिफारसपात्र पात्र ठरले आहेत. दरवर्षी राज्यातील १० ते १२ उमेदवार पहिल्या शंभर क्रमांकांत स्थान मिळवतात. यंदा मात्र पाच ते सहा उमेदवारांनाच पहिल्या शंभरांत स्थान पटकाविता आले आहे. पाचशे उमेदवारांमध्ये राज्यातील २५ ते ३० उमेदवार आहेत. निवड झालेल्यांपैकी ८७ पेक्षा जास्त उमेदवार राज्यातील असून हे प्रमाण ८.६ टक्के आहे.

Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
Kerala Sexual Assual Case
Kerala Sexual Case : लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६४ पैकी २० जणांना अटक; ४० जणांचे नंबर वडिलांच्या मोबाईलमध्ये सेव्ह! चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
eps 95 pension scheme loksatta
ईपीएस-९५ वाढीव पेन्शन धोक्यात, खासगी कंपन्यांचे असहकार्य
75 percent of crimes detected in Thane in last year
ठाण्यात गेल्या वर्षभरात ७५ टक्के गुन्हे उघडकीस
committee has been formed under chairmanship of sub-divisional officer of Daryapur to investigate after Kirit Somaiyas allegations
किरिट सोमय्यांच्‍या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…

देशभरातील निवड झालेल्या उमेदवारांमध्ये ३४७ खुल्या प्रवर्गातील, ११६ उमेदवार आर्थिकदृष्टया मागास, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे, तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांमधून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), केंद्रीय सेवा गट अ आणि गट ब मधील इतर केंद्रीय सेवांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष

राज्यातील यशवंत

समीर खोडे (४२), विवेक सोनावणे (१२६), आशिष पाटील (१४७), तन्मयी देसाई (१९०), हृषिकेश ठाकरे (२२४) समर्थ शिंदे (२५५), श्यामल भगत (२५८), आशिष उन्हाळे (२६७), शारदा मद्यासवार (२८५), निरंजन जाधवराव (२८७), समीक्षा म्हेत्रे (३०२), हर्षल घोगरे (३०८), वृषाली कांबळे (३१०), शुभम थिटे (३५९), अंकेत जाधव (३९५), शुभम बेहेरे (३९७), मंगेश खिलारी (४१४), मयूर गिरासे (४२२), आदिती चौघुले (४३३), अनिकेत कुलकर्णी (४३७), अभिषेक डांगे (४५२), लोकेश पाटील (४९६).

दोन वर्षांनी  मुलांची बाजी

गेली दोन वर्षे या परीक्षेत पहिले तीनही क्रमांक मिळवत मुलींनी बाजी मारली होती. मात्र, यंदाच्या निकालात मुलांनी पहिले दोन क्रमांक पटकाविले आहेत.

अभ्यासात सातत्य राखल्यानेच यश

मुंबई : ‘यूपीएससी’च्या तयारीचा प्रवास आव्हानात्मक होताच. मात्र, वेळेचे योग्य नियोजन केल्याने आणि अभ्यासात सातत्य राखल्याने यश मिळवता आले, अशा प्रतिक्रिया केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांनी दिल्या.

मी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. परंतु नागरी सेवा परीक्षा द्यायची हे सुरुवातीपासूनच मनाशी पक्के केले होते. ‘यूपीएससी’च्या तयारीचा प्रवास आव्हानात्मक असतो. या प्रवासात मानसिकदृष्टया व शारीरिकदृष्टया कणखर राहणे गरजेचे असते. ‘यूपीएससी’च्या प्रवासात बऱ्याच गोष्टी शिकता आल्या आणि वडील स्वत: आयपीएस अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. – जान्हवी शेखर, (क्रमांक १४५)

‘यूपीएससी’च्या तयारीचा प्रवास २०२० पासून सुरू झाला. त्यापूर्वी पुरेशी माहिती नसल्यामुळे काही अडचणी आल्या. त्यानंतर ‘बार्टी’बद्दल कळाले. त्यांची प्रवेश परीक्षा मी उत्तीर्ण झाले. त्यानंतर मला ‘बार्टी’कडून मला सहाय्य मिळाले. – वृषाली कांबळे, (३१०)

वेळेचे योग्य नियोजन करून आणि अभ्यासात सातत्य राखून मी परीक्षेत यश मिळवले. ‘यूपीएससी’ परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांनी अजून एखादा पर्याय हाती तयार ठेवणे गरजेचे असते. मी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून सध्या वाकोडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. – डॉ. अंकेत जाधव,  (३९५)

यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदवी घेतल्यानंतर नोकरी सांभाळून मी अभ्यास केला. वेळेचे नियोजन आणि स्वत:ची अभ्यासपद्धती तयार करून मी हा अभ्यास केला. स्वत:ची कार्यपद्धती असली की अभ्यास करणे सोपे जाते. विविध छंद जोपासल्यामुळे मला परीक्षेच्या प्रवासात कधीच कंटाळा आला नाही. – हिमांशू टेंभेकर, (क्रमांक ७३८) ‘यूपीएससी’ परीक्षा द्यायची हे सुरुवातीपासूनच मनाशी पक्के केले होते. त्यामुळे इयत्ता बारावीला असतानाच तयारीला सुरुवात केली होती. माझा हा तिसरा प्रयत्न होता. वेळेचे नियोजन आणि सातत्य ठेवल्याचा मला खूप फायदा झाला. – ओमकार साबळे, (८४४)

Story img Loader