सांगली : यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सरासरीच्या दीडपटीहून अधिक पाऊस नोंदला गेला असून यामुळे काढणीला आलेली खरीप पिके संकटात तर रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. तसेच थंडीचा हंगाम सुरू होऊनही पावसाचा मुक्काम कायम आहे.

जिल्हा पूर नियत्रण कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ जून ते १५ ऑक्टोबर दरम्यान ९३०.७ मिलीमीटर पाऊस पडला असून पावसाची सरासरी ५६५.९ मिलीमीटर इतकी आहे. सरासरीपेक्षा ६४.५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. अजूनही पाऊस पडत असून गेले दोन दिवस सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. मंगळवारी रात्रीही उशिरापर्यंत जोरदार पाऊस सुरू होता.

Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
Rabi onion cultivation will increase by lakh hectares Mumbai
रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!

हेही वाचा >>> सांगलीत नायकवडींच्या निवडीने अजित पवारांचे दुहेरी ‘लक्ष्य’ ! मुस्लिम समाजास संधी देतानाच जयंत पाटील विरोधकांना बळ

जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस आणि कंसात सरासरी पुढील प्रमाणे मिरज ८४१.२ (४६०.४), जत ६१७.८ (४७१.९), खानापूर ७१६.(५१०.७), वाळवा ११८४.१ (५९५.७), तासगाव ८७७.९ (४९०.२), शिराळा १७१२.८ (९००.१), आटपाडी ५८५.६ (३३७.२) , कवठेमहांकाळ ८३६ (३७५.२), पलूस ८६४.७ (३०९.५) आणि कडेगाव ८४१.२ (५६८) मिलीमीटर. जिल्ह्यात पावसाचा मुक्काम अद्याप कायम असल्याने रब्बी हंगामाची पेरणी लांबणीवर पडली असून खरीप पिकांची काढणीही खोळंबली आहे. पीके काढणीला आल्याने शिराळा तालुक्यात भाताचे मोठे नुकसान होत आहे. तर पूर्व भागात द्राक्ष पिकाची फळछाटणीही अडचणीत आली आहे. पावसाचे प्रमाण कमी होताच छाटणी एकाचवेळी सुरू होणार असल्याने हंगामात एकाचवेळी फळ येण्याची शक्यता असल्याने दराबाबतही अनिश्चितता वाटत आहे. यातच सुरू असलेल्या पावसाने छाटणी झालेल्या भागातील कोवळे घड दावण्या, बुरशीला बळी पडत आहेत.