राज्य सरकार स्वखर्चाने औरंगाबादनंतर मुंबई, पुणे व नागपूर या ठिकाणी स्वतंत्र अशी कॅन्सर रुग्णालय सुरु करणार आहे. मुंबईत कामा रुग्णालयाच्या इमारतीत सुसज्ज युनिट सुरु करण्यात येणार आहे. त्याशिवाय मिरज, अंबेजोगाई व अकोला येथील लहान युनिटचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे. सरकारच्या मालकीची ही रुग्णालये सुरु झाल्यास सर्वसामान्य रुग्णांना अतिशय माफक खर्चात दुर्धर अशा कॅन्सर आजारावर उपचार घेणे शक्य होणार आहे. अर्थात निधीचा प्रश्न सुटला तरच ही प्रस्तावित रुग्णालये लवकरात लवकर सुरु होण्याचा मार्ग सुकर होणार आहे, असे वैद्यकीय शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने विभागवार चार सरकारी कॅन्सर रुग्णालये सुरु करण्याचे ठरविले. त्यानुसार औरंगाबाद येथे २२ नोव्हेंबर २०१२ पासून पहिले कॅन्सर रुग्णालय सुरु करण्यात आले. त्यानंतर आता मुंबई, नागपूर व पुणे येथे अशीच स्वतंत्र रुग्णालये सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. सर्व साधारणपणे इमारत, उकरणे, तज्ज्ञ डॉक्टर्स, इतर कर्मचारी मिळून सुमारे २५० इतके मनुष्यबळ गृहित धरुन एका रुग्णालयाला ४५० ते ५०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता लागणार आहे. राज्यात सध्या फक्त खासगी कॅन्सर रुग्णालये आहेत. त्यामुळे अनेकदा सर्वसामान कुटुंबांना लाख-दोन लाख रुपयांचा उपचाराचा खर्च झेपत नाही. सरकारी रुग्णालये झाली तर माफक खर्चात रुग्णाांना उपचार मिळू शकतो. आता सरकार हा प्रस्ताव किती गांभीर्याने घेते, त्यावर सरकारी कॅन्सर रुग्णालयांचे भवितव्य ठरणार आहे.
सात महिन्यांत ८ हजार रुग्णांवर उपचार
राज्य शासनाचे औरंगाबादमध्ये सात महिन्यांपूर्वी कॅन्सर हॉस्पिटल सुरु झाले. या कालावधीत ८ हजार ९५९ रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आल्याची माहिती या हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपाळे यांनी लोकसत्ताला दिली. त्यापैकी ३७४२ रुग्णांवर केमो थेरपी उपचार करण्यात आले, १६० रुग्णांवर मोठी व ६४० रुग्णांवर लहान शष्टद्धr(२२९क्रिया करण्यात आली. सर्वसाधारणपणे कॅन्सरवरील उपाचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो, या सरकारी रुग्णालयांत दहा हजार रुपयांमध्ये उपचार केले जातात, असे डॉ. भोपाळे यांनी सांगितले.
राज्यात आणखी तीन सरकारी कॅन्सर रुग्णालये
राज्य सरकार स्वखर्चाने औरंगाबादनंतर मुंबई, पुणे व नागपूर या ठिकाणी स्वतंत्र अशी कॅन्सर रुग्णालय सुरु करणार आहे. मुंबईत कामा रुग्णालयाच्या इमारतीत सुसज्ज युनिट सुरु करण्यात येणार आहे. त्याशिवाय मिरज, अंबेजोगाई व अकोला येथील लहान युनिटचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे. सरकारच्या मालकीची ही रुग्णालये सुरु झाल्यास सर्वसामान्य रुग्णांना अतिशय माफक खर्चात दुर्धर अशा कॅन्सर आजारावर उपचार घेणे शक्य होणार आहे.
First published on: 28-06-2013 at 01:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More three cancer hospitals in state