प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याच्या आश्वासनावर केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. १५ लाख रूपयांची घोषणा करण्यात आली. त्यावेळी त्यांना तुम्ही विचारले का?, असा प्रश्न विचारतानाच देशात सरकार आल्यावर सर्व सामान्य नागरिकांना तेल, तांदूळ, गहू, तूरडाळ या जीवनवश्यक वस्तूंचा पुरवठा कमी पडू दिला नाही आणि भाव देखील स्थिर ठेवले. त्याची तुलना केल्यास ही रक्कम १५ लाखांपेक्षा जास्त होईल, असा दावा त्यांनी केला.

व्ही. के. सिंह यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये कधी जमा करणार?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर सिंह म्हणाले, देशात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व सामान्य नागरिकांना तेल, तांदूळ, गहू, तूरडाळ या जीवनवश्यक वस्तूचा पुरवठा कमी पडू दिला नाही आणि भाव देखील स्थिर ठेवले. या सर्वांची तुलना केल्यास हा आकडा १५ लाखांपेक्षा जास्तच आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सिंह यांनी भारत – पाकिस्तान संबंधांसंदर्भातही भूमिका स्पष्ट केली. अमेरिका, रशिया, सौदी अरेबिया या सर्व देशांसोबत भारताचे चांगले संबंध आहे. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी सत्तेत येताच नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा देखील केली. त्यावेळी कोणताही तोडगा निघाला नसून सीमेवरील तणाव आणि गोळीबार बंद होत नाही. तोवर पाकिस्तान सोबत चर्चा होणार नाही, असे त्यांनी पाकला सुनावले.

सिंह पुढे म्हणाले की, भाजपा सरकार आल्यावर मागील ५५ महिन्यांमध्ये जितका विकास झाला तो गेल्या ५५ वर्षांमध्ये झाला नाही. सरकारकडून सर्व सामान्यांच्या दृष्टीने निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील प्रत्येक ठिकाणी वीज पोहोचविण्याचे काम सरकारने केले. या सरकारने जाती धर्माच्या पलीकडे विकास पोहोचवला असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader