Mother and Son Death : आई आणि मूल यांचं नातं हे जगातलं सर्वात श्रेष्ठ नातं आहे. या नात्यात कधीही व्यवहार येत नाही. आई मुलासाठी झटत असते आणि मुलगा आईसाठी. अनेकदा तशी उदाहरणंही समोर येतात. बीडमध्ये घडलेल्या एका घटनेने कुणाच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या होतील. आईचं निधन झालं त्यामुळे घरात दशक्रिया विधी होता, दहाव्या दिवशी हा विधी केला जातो. त्याच दिवशी मुलाची अंतयात्रा निघाली. त्यामुळे परळी येथील संत सावता मंदिर परिसर हळहळला आहे. तारामती लक्ष्मण शिंदे यांचं निधन झालं. त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजेच त्यांचा दहावा असताना तारामती यांचा मुलगा बालाजी लक्ष्मण शिंदे यांचं निधन ( Mother and Son Death ) झालं.
नेमकी काय घटना घडली?
बालाजी लक्ष्मण शिंदे हे बीडमधल्या परळीतले रहिवासी. गणेशपार भागात त्यांना बम्बईया या टोपण नावाने सगळेच ओळखत. स्कूल ऑटो चालक म्हणून मागील ३० वर्षांपासून अधिक काळ ते रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. पाऊस असो किंवा कडाक्याची थंडी त्यांची रिक्षा पहाटे पाचला सुरु व्हायचीच. वेळेवर येणारा बम्बईया अशी त्यांची ओळख होती. याच व्यवसायातून जे पैसे मिळाले त्यातून त्यांनी त्यांच्या मुलाला इंजिनिअर आणि मुलीला उच्चशिक्षित केलं. बालाजी शिंदे यांच्या आई तारामती यांचं वयाच्या ८० व्या वर्षी ४ सप्टेंबरला निधन झालं. यामुळे ते खूप दुःखी झाले. ज्यानंतर पुढच्या दहाच दिवसात त्यांचंही निधन ( Mother and Son Death ) झालं.
हे पण वाचा- ‘कन्यादान’ फेम अभिनेत्याच्या आईचं निधन, कर्करोगाशी झुंज झाली अपयशी, भावुक होत म्हणाला, “माझी आई…”
१२ सप्टेंबरला काय घडलं?
१३ सप्टेंबर या दिवशी बालाजी यांच्या आईचा दशक्रिया विधी म्हणजेच दहावा होता. तर त्यानंतर चार दिवसांनी संत सावता मंदिरात चौदावा करण्याचंही त्यांनी ठरवलं होतं. चौदावा दिवस कधीही आहे? वेळ काय? या सगळ्याची माहिती देणाऱ्या व्हॉट्स अॅप पत्रिकाही त्यांनी नातेवाईकांना आणि आप्तस्वकियांना पाठवल्या. मात्र १२ सप्टेंबर या दिवशी बालाजी शिंदेंना अस्वस्थ वाटू लागलं. ज्यानंतर मित्रांनी त्यांना परळीतल्या रुग्णालयात दाखल केलं. हृदयविकाराच्या अनुषंगाने त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र प्रकृती संदर्भात गुंतागुंत वाढली. त्यामुळे बालाजी शिंदेंना त्याच दिवशी लातूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरुच होते पण मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्राणज्योत ( Mother and Son Death ) मालवली.
आईचा दशक्रिया विधी असतानाच मुलाची अंतयात्रा
शनिवारी म्हणजेच १३ सप्टेंबरला ज्या दिवशी बालाजी यांच्या आईचा दहावा होता त्याच दिवशी त्यांची अंतयात्रा ( Mother and Son Death ) निघाली. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईचा वारल्यानंतरचा दहावा दिवस आणि मुलानेही जगाचा निरोप घेतला या घटनेने परळी हळहळली आहे. बालाजी शिंदे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असं कुटुंब आहे.