लातूर – आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सीबीएससी शाळेत आपल्या मुलीला प्रवेश घेता येणे शक्य नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी या गावात घडली आहे.
हेही वाचा – सातारा : कश्मिरा पवार, गायकवाडला दोन दिवस पोलीस कोठडी
हेही वाचा – “उद्धव ठाकरेंकडे मूळ वृक्ष नाही, फांदी घेऊन काड्या…” सुधीर मुनगंटीवारांचा टोला
भाग्यश्री व्यंकट हालसे (वय २६) व समीक्षा व्यंकट हालसे (वय ५) असे मृत आई मुलीचे नाव आहे. व्यंकट हालसे यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा सार्थक व मुलगी समीक्षा आहेत. त्यांना दीड एकर शेती आहे व तीही आई-वडिलाकडे आहे. शेळ्या राखून कुटुंबाची उपजीविका भागवत असल्याने हालसे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. हालसे यांच्या पत्नीची आपल्या मुलांना सीबीएससी शाळेत प्रवेश द्यावा अशी इच्छा होती. मात्र पती काही न बोलता बघूया असेच सांगत होता. आपल्या मुलांना सीबीएससी शाळेत प्रवेश मिळणे शक्य नसल्याने मंगळवारी भाग्यश्री हालसे हिने समीक्षाला सोबत घेऊन एका विहिरीत उडी घेतली. मुलगा समर्थ हा खेळत होता आणि आईने त्याला बोलावल्यावरही तो आईसोबत गेला नाही म्हणून तो वाचला. नैराश्यातून ही घटना घडली आहे. भाग्यश्री हालसे यांची आई वारली होती वर्षभर त्याही निराशेने तिला ग्रासले होत्या.
© The Indian Express (P) Ltd