सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू सुशीलाबाई विठ्ठल कदम (रा. वसई, ता. औंढा) हिला वसतम जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.मृत कान्होपात्रा युवराज कदम (वय २२) हिने सासूकडून होणारा छळ असह्य़ होऊन आपणास माहेरी न्यावे, अशी विनंती पतीला केली. मात्र, त्याने दुर्लक्ष केले. सासूच्या छळाला कंटाळून कान्होपात्रा हिने घरातील सर्वजण शेतावर गेले असता, २३ सप्टेंबर २००९ रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. या प्रकरणी सासू जबाबदार आहे, इतर कोणाचा त्रास नव्हता. पती व सासरा यांचाही त्रास नव्हता, असा जबाब हिंगोली जिल्हा रुग्णालयात मृत्यूपूर्व जबानीत कान्होपात्राने हिने दिला होता.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother in law sentence