बारावीचा निकाल नुकताच लागला. मुंबईस महाराष्ट्राचा निकाल खूप चांगला लागला. अशात मुंबईतल्या एका आई-मुलाने दिलेली परीक्षा चर्चेत आहे. मुंबईत एका आईने देखील आपल्या मुलासह २८ वर्षांनंतर १२ वीची परीक्षा दिली आणि मुलगा आणि आई देखील उत्तीर्ण झाली आहे. गीता अजयकुमार पासी असं या उत्तीर्ण महिलेचे नाव आहे तसेच आर्यन अजयकुमार पासी असं मुलाचे नाव आहे. जर इच्छा आणि जिद्द असेल, तर वय महत्त्वाचं नसते तर मेहनत महत्वाची आहे याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
२८ वर्षांनी गीता पासी यांनी दिली परीक्षा
मुंबईमध्ये कुर्ला भागात राहून एक आईचे कर्तव्य बजावत आणि नोकरी सांभाळून तब्बल २८ वर्षांनंतर गीता पासी यांनी १२ वीची परीक्षा दिली आहे. माझ्या मुलाने इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन केले आहे. घरातील सदस्यांसह माझ्या पतीनेही परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी प्रोत्साहीत केलं. माझं स्वप्न आहे की उत्तम पत्रकार होऊन समाजात काम करायचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मागील मंगळवारी महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल जाहीर केला. महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा एकूण उत्तीर्ण टक्केवारी ९३.३७% आहे. यावर्षी मुलींची पास टक्केवारी ९५.४४% आहे, तर मुलांची पास टक्केवारी ९१.६०% आहे. मी व माझा मुलगा आर्यन आम्ही दोघे १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालो आहोत आणि आम्ही खूप आनंदी आहेत अशी प्रतिक्रिया गीता पासी यांनी दिली आहे.
१२ वीची परीक्षा झाल्याव मुलाला डॉक्टर व्हायचं आहे
आता १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे एमबीबीएस डॉक्टर बनायचे आहे, त्यामुळे मी यापुढे अधिक मेहनत करणार अशी प्रतिक्रिया आर्यन पासी या उत्तीर्ण मुलाने दिली आहे. तर गीता पासी यांना पत्रकार व्हायचं आहे.
गीता पासी यांनी काय म्हटलं आहे?
“मी आणि माझ्या मुलाने दहावीची परीक्षाही दिली. आत्ता बारावीच्या परीक्षेत मला ८३ टक्के गुण मिळाले. मुलाला शिकवताना मलाही हे वाटलं की आपण बारावीची परीक्षा द्यावी. माझ्या मुलाने आणि पतीनेही मला सांगितलं की तू बारावीची परीक्षा दे. सुरुवातीला मला थोडं अभ्यासाचं टेन्शन आलं होतं. पण आम्ही दोघांनी मिळून अभ्यास केला. दहावीची परीक्षा पास झाल्यावर आत्मविश्वास बळावला. त्यानंतर मी नोकरी करुन बारावीची परीक्षा दिली. घरातली जबाबदारीही सांभाळली होती. पण मला आज आनंद आहे की मी मुलासह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. मलाही याचा अभिमान आहे तसंच मुलालाही माझा अभिमान आहे.” असं गीता पासी यांनी म्हटलं आहे.