मुलाचे अपहरण आणि खूनप्रकरणी आज प्रत्यक्ष मुलाच्या आईलाच अटक करण्यात आली. पतीबरोबर झालेल्या भांडणाचा राग मुलावर काढत या महिलेने आपल्या पावणेदोन वर्षांच्या मुलाचा खून केला. आर्यन शिरीष सासणे असे या मुलाचे नाव आहे, तर ज्योती शिरीष सासणे हे या मुलाच्या आईचे नाव असून तिला अटक करण्यात आली आहे.
दागिन्यांच्या हव्यासातून बालकाचे अपहरण करून खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आल्यावर सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास करताना आज याप्रकरणी मुलाच्या आईलाच अटक केली. ज्योतीचे तिच्या पतीबरोबर काल कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर पती बाहेर गेल्यावर ज्योतीने या घटनेचा संपूर्ण राग आपल्या चिमुकल्यावर काढत त्याचा खून केला. यानंतर त्याचा मृतदेह कोल्हापुरातील पुई-खडी या निर्जन भागात नेऊन टाकला आणि मुलाच्या अपहरणाची तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर त्याच्या खुनाची घटना उघडकीस आली. आज पोलिसांनी याप्रकरणी ज्योतीकडे अधिक चौकशी केल्यावर तिनेच खून केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर ज्योतीला अटक करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा