रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून खुद्द अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावेळी शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार उपस्थित होते. या सर्वांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही अजित पवारांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. मात्र, आता अजित पवार गटाला बंडानंतरचा पहिला धक्का बसला असून खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांचा रविवारी दुपारी शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्याला खुद्द अमोल कोल्हे उपस्थित होते. एवढंच नाही, तर कार्यक्रमानंतर अमोल कोल्हेंचा सुधीर मुनगंटीवार यांच्या पाया पडतानाचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात सहभागी झाल्याचं सांगितलं जात होतं. अजित पवारांनीही सगळ्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं मत व्यक्त केलं होतं. मात्र, आज अमोल कोल्हेंनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचं ट्वीट करून स्पष्ट केलं आहे.

“मी साहेबांसोबत!”

“जब दिल और दिमाग में जंग हो, तो दिल की सुनो. शायत दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है. पर दिल कभी नहीं. मी साहेबांसोबत”, अशा सूचक शब्दांत अमोल कोल्हेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“शपथविधीबाबत माहितीच नव्हतं!”

दरम्यान, शपथविधीबाबत आपल्याला माहिती नव्हती, असा दावा अमोल कोल्हेंनी टीव्ही ९ शी बोलताना केला आहे. “मी शरद पवारांसोबतच आहे. मी त्यांना भेटून सविस्तर प्रतिक्रिया देईन. मी काल एका वेगळ्या कामासाठी भेटायला गेलो होतो. मला शपथविधीची कल्पना नव्हती”, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

NCP Split: “सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री…”, राज ठाकरेंचा मोठा दावा; म्हणाले, “हे सगळे असेच जाणार नाहीत तिकडे!”

काय आहे व्हिडीओमध्ये?

अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आधी त्यांनी माध्यमांना काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेतील “साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण”, हे वाक्य आहे. त्यापुढे लगेच पडद्यावरील त्यांच्या एका संवादातील वाक्य आहेत. “इथे सगळं विसरायचं, पण बाप नाही विसरायचं. त्याला भेटल्यानं, जवळ बसल्यानं, मायेनं विचारपूस केल्यानं तो कणसाळतो, कोंबारतो. त्याला नाही विसरायचं. त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये आपण सुख होऊन वाहायचं”, असे अमोल कोल्हेंचे संवाद या व्हिडीओमध्ये आहेत.