रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम कच्चा तेलाच्या किमतींवर झाल्याचे दिसत असून, जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरेल ९५ ते १२५ अमेरिकन डॉलर होण्याची शक्यता आहे. परिणामी इंधन दर आणखी वाढण्याची शक्यता असून, पेट्रोल आणि डिझेल दरता प्रति लिटर मागे १५ ते २२ रुपयांनी वाढ होणार असल्याचे दिसत आहे. आज उत्तर प्रदेशात मतदानाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ही वाढ जाहीर होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील ट्वीटद्वारे निशाणा साधला आहे.

“निवडणुका संपणार, सरकारचे खरे रुप दिसणार, इतके दिवस निपचित पडून असलेले पेट्रोल-डिझेलचे दर जोराची उसळी घेणार! ऊन्हाचा भडका झालाय, तसा इंधन दर वाढीचाही होणार!” असं खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीटद्वार म्हटलं आहे.

Reliance Industries Q3 results,
रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही नफा वाढून १८,५४० कोटींवर; शेअरच्या भाव वाढेल काय, विश्लेषकांचे अंदाज काय?  
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
crude oil prices at 80 dollar per barrel on global supply concerns
तेल किमती वाढ, चार महिन्यांतील उच्चांकी पातळी; खनिज तेलाचे भाव पिंपामागे ८० डॉलरवर
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Petrol and Diesel Prices 10 January In Marathi
Petrol Diesel Rate : महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल; घराबाहेर पडण्यापूर्वी येथे चेक करा नवीन दर
shortage of Wheat flour companies
पीठ कंपन्यांना जाणवतोय गव्हाचा तुटवडा; जाणून घ्या, अन्न महामंडळाची भूमिका किती महत्त्वाची

VIDEO : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत ओवेसींनी केलं भाकीत म्हणाले, “७ तारखेच्या रात्री किंवा १० मार्चला सकाळी…”

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील इंधन दरवाढीबद्दल भाकीत केलेलं आहे, “पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा की ७ तारखेच्या रात्री किंवा १० मार्चच्या सकाळी तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसतील. हे भाव वाढतील आणि सांगतील की, युक्रेनमध्ये असं घडलय, तसं घडलय…काहीपण बोलतात. कारणं तयार करतात की असं घडलं, तसं घडलं आणि बिचारे भाजपाचे भक्त म्हणतात की नाही नाही मोदींनी योग्यचं केलं. तुमच्या गाडीत पेट्रोल मोदी टाकतोय, की गरीब स्वत:च्या पैशांनी गाडीत पेट्रोल भरतोय.” असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारची “पोल ऑफर” संपणार आहे – राहुल गांधी

दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे, ते म्हणाले की “लोकांनी त्यांच्या कारची टाकी भरली पाहिजे” कारण मोदी सरकारची “पोल ऑफर” संपणार आहे.”

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील दिलेले आहेत संकेत –

काही दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील एका निवडणूक प्रचारसभेत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर आणखी परिणाम होऊ शकतो, असे संकेत दिले होते. ते म्हणाले होते की, “जर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुढे सरकले तर संकट आणखी गडद होईल. मी आधीच सांगतोय की संकट गंभीर होईल. तेल आणि गॅस रशियातून बहुतेक देशांमध्ये जातो.”

टाकी आजच फूल करा; पेट्रोल- डिझेल १५ ते २० रुपयांनी महाग होऊ शकतं

दरम्यान, इंधन दरवाढीची शक्यता पाहता आज पेट्रोल पंपावर नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. तथापि, उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होणारा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो, परंतु पूर्णपणे नाही. सद्यस्थितीत, भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्के आयात करतो. इंधन दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा उत्पादक देश आहे. रशियावरील निर्बंधांमुळे जागतिक पुरवठा कमी होईल अशी भीती आहे.

Story img Loader