रझा अकादमी आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी खासदार अनिल बोंडेंची यांनी केली आहे. खासदार नवनीत राणा यांना आलेल्या पत्रासंदर्भात ते बोलत होते. तसेच राणा यांना आलेली धमकी गमतीने घेऊ नये, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवनीत राणा यांना आलेलं पत्र मी वाचलं आहे. अशी पत्र कधीही गमतीने घेऊ नये. काही दिवसांपूर्वीच अमरावतीत उमेश कोल्हे प्रकरण घडले होते. या प्रकरणात पीएफआय या संघटनेच्या लोकांना अटक करण्यात आली होती. त्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे पीएफआय असेल किंवा रझा अकादमी असेल या संघटनांवर बंदी घालायला पाहिजे, असे खासदार अनिल बोंडे म्हणाले.

हेही वाचा – ‘महाराष्ट्रात कशाला जन्म घेतलात’ विचारणाऱ्या उद्धव ठाकरेंना शहाजीबापू पाटलांचं उत्तर; म्हणाले “रागीट आणि चिडखोर स्वभावामुळे….”

पुढे ते म्हणाले, ” रझा अकादमी आणि पीएफआय या संघटना समाजकारणाच्या नावाखाली लव्ह जिहाद आणि दशहतवाद पसवण्याचं काम करतात. त्यामुळे माजी केंद्र आणि राज्य शासनाला विनंती आहे की त्यांनी या संघटनांवर बंदी आणावी”

नवनीत राणांना पत्र

खासदार नवनीत राणा यांना एका मुस्लीम व्यक्तीने एक पत्र लिहीले आहे. या पत्रात नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याचे त्याने म्हटले आहे. ”मी एक सरकारी कर्मचारी असून आपल्या शहरातील सर्वसामान्य व्यक्ती आहे. आपण माझी बदली करण्यासाठी खुप मदत केली होती. तसेच माझा वाडीलांची कोरोना काळात मदत केली होती. मला अशी माहिती मिळाली आहे की काही लोक राजस्थानवरून अमरावतीत दाखल झाले आहेत. ते लोक आपला पाठलाग करत आहे. तसेच ते तुमच्या घरीही येऊन गेले. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यावी”, असे या पत्रात लिहीले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp anil bonde demand to impose ban on raza academy and pfi organizations spb