मुंबई : मुस्लिमांमधील पसमांदा मुस्लीम समाजाला जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी भाजपचे अल्पसंख्याक समाजाच्या विरोधातील धोरण लक्षात घेता मुस्लीम समाजाचा पाठिंबा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न कदापीही यशस्वी होणार नाही, असा दावा एमआयएमचे प्रमुख व खासदार असुदुद्दिन ओवैसी यांनी शनिवारी केला. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला विरोध कायम राहणार असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले.

ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लमीन (एमआयएम) पक्षाच्या दोन दिवसीय पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाला नवी मुंबईत प्रारंभ झाला. या अधिवेशनात आगामी काळात एमआयएम हा राष्ट्रीय पातळीवर प्रभावी पक्ष म्हणून ताकद निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला. पहिल्या दिवशी विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि नेत्यांनी त्या त्या राज्यांमधील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एमआयएमची राष्ट्रीय पातळीवर बांधणी करण्यात येणार आहे. आगामी काळात जास्तीत जास्त खासदार आणि आमदार निवडून आणण्याची योजना ओवेसी यांनी जाहीर केली. उद्या, रविवारी दुसऱ्या दिवशी राजकीय ठराव तसेच आगामी काळातील पक्षाचे धोरण जाहीर करण्यात येणार आहे.

bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
bjp and ajit pawar ncp political conflict over allegations against dhananjay munde
धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून
Setback to Sena (UBT) in Pune 5 ex corporators of party set to join BJP
पाच माजी नगरसेवक करणार मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश; पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का
delegation met the Governor on Monday
मुंडेंना अजितदादांचे अभय; पुरावा मिळेपर्यंत कारवाई न करण्याची भूमिका
dhananjay munde
मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक; भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप

मुस्लीम समाजातील कनिष्ठ वर्ग म्हणून मानल्या जाणाऱ्या पसमांदा समाजाला जवळ करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात मांडली होती.  या पार्श्वभूमीवर एमआयएमचे ओवैसी यांनी पसमांदा समाजाचा पाठिंबा मिळेल हे गृहित धरू नका, असा इशारा भाजपला दिला.

नामांतराला विरोध कायम

रंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यास एमआयएमचा विरोध कायम राहिल, असे ओवैसी तसेच पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात न घेताच परस्पर हे नामांतर करण्यात आले आहे, असा आरोप खासदार जलील यांनी केला. नाव बदलून औरंगाबादचा विकास होणार आहे का किंवा शहरातील नागरिकांना दोन वेळ पुरेसे पाणी मिळणार आहे का, असा सवालही त्यांनी केला.

Story img Loader