हिंगोली : सात महिन्यांपासून न झालेली जिल्हा वार्षिक योजनेची बैठक, रोहित्रासाठी दिलेली रक्कम केवळ स्वीय सहायकांच्या सांगण्यावरून बदलणे, तसेच निधीवरून तक्रार केल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांना ‘तुम चूप बैठो’ असे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दटावल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी त्यांना बैठकीतच उलट उत्तर दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं”, अजित पवारांच्या विधानावर रोहित पवार प्रत्युत्तर देत म्हणाले…

पैसे घेऊन मंत्री सत्तार यांचे सहायक वार्षिक आराखडयातील तरतुदी बदलत आहेत. ज्याची गरज नाही ते काम योजनेत घुसडवत असल्याचा आरोप खासदार हेमंत पाटील यांनी केला. गेल्या सात महिन्यांपासून हिंगोली जिल्हा वार्षिक योजनेची बैठक पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली नव्हती. शनिवारी ही बैठक ‘ऑनलाईन’ घेण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत निधी इतरत्र का खर्च होतो, असा प्रश्न खासदार हेमंत पाटील यांनी उपस्थित केला.  गेल्या वर्षीच्या खर्चाच्या हिशेबाची मागणी त्यांनी केली. असा खर्चाचा तपशील देण्याची गरज नाही, असे पालकमंत्री सत्तार म्हणाले. एका योजनेसाठी मंजूर झालेला निधी दुसऱ्या योजनेवर खर्च होतो कसा, असा प्रश्न हेमंत पाटील यांनी उपस्थित केला. रोहित्राची मागणी आहे, पण त्यासाठी निधीच नाही. ती तरतूद केबलवर खर्च करण्यात आली. यावरून वाद झाल्यानंतर अधिकारीही गोंधळात पडले. शेवटी १६७ कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली. रोहित्रासाठी पूर्वी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातून २५० रोहित्र घ्यायचे होते. मात्र, काही अभियंत्यांना हाताशी धरून केबलवर ही रक्कम खर्च करण्यात आली. शाळांमधील स्वच्छतागृहांचा निधी सीसीटिव्हीवर वापरण्यात आला. खरे तर स्वच्छतागृहांची गरज अधिक असताना वाट्टेल तसा निधी वापरला जात असल्याची तक्रार या बैठकीत करण्यात आली. मात्र, बैठकीत खासदारांना ‘तुम चूप बैठो’ असे  म्हटल्याने सत्तार आणि खासदार यांच्यामध्ये शिवराळ भाषा वापरण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, खडाजंगी झाल्याचे खासदार पाटील यांनी मान्य केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp hemant patil say tum chup baitho to minister abdul sattar in district annual planing meeting zws