आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याची घोषणा राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी केली. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच आगामी निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होणार असून लोकांची ते दिशाभूल करत आहेत. ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना’ अशी त्यांची स्थिती झाली आहे. दोघांना एकमेकांची गरज आहे. एकत्र आले नाही तर सत्ता येणार नाही हे त्यांना माहीत आहे. पाच विधानसभा निवडणुकीत त्यांना फटका बसला आहे. त्यामुळे ते युती करणारच असे ते म्हणाले.

स्वाभिमान पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा लढवणार हे सांगितले नाही. तसेच आगामी विधानसभा निवडणूक लढणार की नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले नाही. त्याचबरोबर शरद पवार यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले.

पाच राज्यात भाजपाला मोठा फटका बसला आहे. त्यांची स्पष्ट भूमिका नसल्याने हा फटका बसला आहे. शिवसना आणि भाजपा लोकांची दिशाभूल करत आहेत. पण दोघांना एकमेकांची गरज आहे. आपण आगामी निवडणुकीत भाजपाबरोबर नसणार हे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader