आज १४ फेब्रुवारी असून जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात प्रेमदिवस साजरा केला जात आहे. अनेक तरुण-तरुणी आपल्या जीवलग व्यक्तीला गिफ्ट देऊन हा दिवस साजरा करतात. पण अमरावतीमध्ये एक अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’ पाहायला मिळाला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी हा दिवस एकत्र साजरा केला आहे. आमदार आणि खासदाराने अशा पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केल्याने परिसरात एकच चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर, आज सकाळी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा आपल्या कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते. पण प्रेमदिवसाचं औचित्य साधत रवी राणांनी आपल्या पत्नी नवनीत राणा यांना खास सरप्राईज दिलं आहे. दुपारी दोनच्या आसपास दोघांनी एका कॅफेत एकत्र येत कॉफी प्यायली आहे. यावेळी रवी राणांनी एक गुलाबाचं फुलही नवनीत राणा यांना दिलं आहे.

आमदार-खासदाराचा हा अनोखा व्हॅलेंटाईन डे अमरावती मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे. रवी राणा यांनी एक महत्त्वाचं काम असल्याचं सांगून नवनीत राणा यांना तातडीने बोलावून घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी नवनीत राणांना गुलाब देऊन प्रेमदिवस साजरा केला. तसेच आज सकाळी आपण आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडलो होतो, अशी माहिती रवी राणांनी दिली.

हेही वाचा- “मुली शिक्षणासाठी शहरात जातात अन् भाड्याच्या खोलीत मुलांबरोबर…”, ‘लिव्ह इन रिलेशन’वरून नवनीत राणांचं विधान

विशेष म्हणजे, खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी अमरावती येथील एका कार्यक्रमात पाश्चिमात्य संस्कृतीवर टीका केली होती. यानंतर आज दुसऱ्याच दिवशी त्यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे. त्यामुळे नवनीत राणांना काही नेटकरी ट्रोल करत आहेत. “लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल आपण आयुष्यात कधीही ऐकलं नव्हतं. आई-वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात, पण मुली तिकडे जाऊन मुलांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात,” असं विधान नवनीत राणा यांनी केलं होतं.