अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच पोलिसांनाही माझं दुःख पाहावलं नाही असं म्हणत तुरुंगातील प्रसंग सांगितला. त्या गुरुवारी (६ एप्रिल) अमरावतीत हनुमान जयंतीनिमित्त आयोजित सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमावेळी बोलत होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवनीत राणा म्हणाल्या, “उद्धव ठाकरेंनी पोलिसांना माझ्या घरात जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांना वरून आदेश देण्यात आले होते. पोलीस हतबल होते, त्यांनी माझ्यासमोर हात जोडले होते. मुख्यमंत्री कोणत्या अहंकारात होते हा माझा प्रश्न आहे. बाळासाहेब ठाकरेंनी रक्ताचं पाणी करून घराघरात हिंदू विचार पोहचवला, शिकवला. त्यांच्याच मुलगा उद्धव ठाकरेंनी ५६ वर्षांच्या मेहनतीची माती केली.”
“पोलिसांनाही माझं दुःख पाहावलं नाही, ते म्हणाले मॅडम…”
“मला तुरुंगात ठेवण्यात आलं तेव्हा मी भगवी साडी नेसलेली होती आणि रात्रभर मी उभी होते. त्यांनी मला बसायलाही काही दिलं नव्हतं. एक कॉन्स्टेबल म्हणाला की, मॅडम तुम्ही रात्रीपासून सकाळपर्यंत उभ्या आहात. आम्हाला महिला म्हणून तुमचं हे पाहावलं जात नाही. सगळे कॉन्स्टेबल सकाळी मला येऊन भेटले आणि म्हणाले की, मॅडम ही जागा तुमच्यासाठी नाही. आम्ही काहीच करू शकत नाही, पण हे नक्की आहे की, तुम्ही येथून निघाल तेव्हा झाशीची राणी बनून बाहेर पडाल”, असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं.
“…तेव्हा मी भावूक झाले होते”
नवनीत राणा पुढे म्हणाल्या, “आमच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर आम्हाला लगेच जामीन मिळेल असं वाटलं. मात्र, कोर्टाने जेव्हा पोलीस डायरी पाहिली तेव्हा त्यात आमच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला होता. त्यात लवकर जामीन होत नाही. त्यामुळे आम्हाला तुरुंगात राहावं लागणार होतं. कधीपर्यंत तुरुंगात रहावं लागेल माहिती नव्हतं. तेव्हा मी भावूक झाले होते.”
“तुरुंगात पाणी मागितलं तर दिलं नाही”
“तुरुंगात १२ तास मी उभे राहून विचार केला आणि सकाळी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे मला दुःख सहन झालं नाही. तुरुंगात पाणी मागितलं तर म्हटले सीसीटीव्ही आहे देऊ शकत नाही”, असाही आरोप नवनीत राणा यांनी केला.