बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील उरलेल्या १५ आमदारांपैकी आठ आमदार शिंदे गटात येतील, असा दावा केला आहे. तसेच ठाकरे गटातील उर्वरित पाचपैकी तीन खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत येतील,असं म्हटलं. ते मंगळवारी (२२ नोव्हेंबर) बुलढाण्यात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

प्रतापराव जाधव म्हणाले, “अजूनही ठाकरे गटातील खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत, पण त्यांच्या स्थानिक पातळीवरील काही वैयक्तिक अडचणी आहेत. ते नेतृत्वावर प्रेम आहेत म्हणून ठाकरे गटात थांबलेले नाहीत. त्यांच्या जिल्ह्यात स्थानिक पातळीवरचे व्यक्तिगत प्रश्न असल्याने ते तिकडे थांबले आहेत.”

“निवडणुका जवळ येतील तसं त्यांचं घर रिकामं होईल”

“शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात आले. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसं त्यांचं घर रिकामं झालेलं दिसेल. तसेच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना मजबुतीने पुढे येईल,” असं मत प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचं तिकडे घाला, पण…”, केंद्रीय मंत्र्यांचा उल्लेख करत शिंदे गटातील आमदाराचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तेव्हा १५ पैकी किमान ७-८ आमदार शिंदे गटात येतील”

“ठाकरे गटातील सर्वच आमदार स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे तेथे थांबले आहेत. निवडणुका येतील तेव्हा १५ पैकी किमान ७-८ आमदार आणि पाचपैकी दोन ते तीन खासदार शिंदे गटात येतील,” असा दावाही खासदार प्रतापराव जाधवांनी केला.