महाराष्ट्रासह दिल्लीतील काँग्रेसच्या नेतृत्वाला आज धक्का बसला. काँग्रेस श्रेष्ठीच्या वर्तुळातील महत्त्वाचे नेते असलेल्या खासदार राजीव सातव यांचं रविवारी पहाटे पाच वाजता निधन झालं. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगिर रुग्णालयात उपचार सुरू होते. करोनावर मात करत असतानाच सातव यांना सायटोमॅजिलो विषाणूचा संसर्ग झाला होता. हा विषाणू नवीन प्रकारचा असून, त्याची लक्षणंही वेगळी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायटोमॅजिलो विषाणू म्हणजे काय?

सायटोमॅजिलो हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. अमेरिकेमध्ये ४० वर्ष पूर्ण झालेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात हा विषाणू आढळून येतो. हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लाळ किंवा थुंकीद्वारे प्रसरतो.

रोग प्रतिकार शक्ती कमजोर असणाऱ्यांसाठी धोकादायक

या विषाणूंचं करोनासारखंच आहे. ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती चांगली असते, ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात. रोग प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर या विषाणूचा शरीरावर प्रभाव जाणवत नाही. मात्र, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते, त्यांच्याशी हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

सायटोमॅजिलोची लक्षणं कोणती?

सायटोमॅजिलोचा संसर्ग झाल्यानंतर त्याची प्राथमिक लक्षणंही दिसून येतात. बाधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल जाणवतात. डोकेदुखे, श्वास घेताना अडचण येते, ताप येणे ही सायटोमॅजिलोची लक्षणं आहेत. सायटोमॅजिलोचा संसर्गचं निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते. सायटॉमॅजिलो हा विषाणू लहान मुलांमध्ये देखील आढळतो. याशिवाय गरोदर महिलांमध्येही हा विषाणू आढळून येतो.

“राजीव सातव यांच्यावर करोना आजारावर उपचार सुरू होते. काही दिवसात त्यांच्या आजाराचा रिपोर्ट निगेटिव्ह देखील आला होता. मात्र त्याच दरम्यान त्यांच्या फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यातून ते लवकरात बरे, व्हावे यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाल्याची घटना घडली,” अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या निधनानंतर माहिती दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp rajeev satav death after cytomegalovirus infection rajeev satav letest news bmh