छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात शिवभक्त मंडळी सोहळा साजरा करण्यात मग्न झाली आहेत. शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाचा उत्साह प्रत्येक मराठी बांधवाच्या चेहऱ्यावर देखील दिसून येत आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी शिवजयंतीनिमित्ताने प्रत्यक्ष वा ट्विटरवर शुभेच्छा देताना शिवरायांना मानवंदना दिली आहे. भोसले घराण्याचे वंशज आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाराजांच्या नावानं सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतानाच कळकळीचं आवाहन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“नुसता जयजयकार करून चालणार नाही”

“शिवाजी महाराज हे सर्वंसाठी आदर्श आहेत. असा जगात कुठलाच राजा झाला नाही की ३०० वर्षांनंतरही lrच प्रेरणा शिवभक्त घेऊन जातात. माझी शिवभक्तांना विनंती एकच राहील. नुसता जयजयकार करून चालणार नाही. पण शिवाजी महाराजांचा आचार-विचार, त्यांचं आत्मचिंतन करून आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसे पुढे जाऊ शकतो, या दृष्टीकोनातून बघावं असं माझं सगळ्या युवकांना आवाहन आहे”, असं संभाजीराजे भोसले म्हणाले आहेत.

दरम्यान, आज सकाळी शिवनेरीवर दरवर्षीप्रमाणे शिवजन्माचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवजयंतीच्या निमित्ताने राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा आणि शिवरायांना मानवंदना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून ट्वीट करत शिवरायांना नमन केलं आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील ट्विटरवर पोस्ट शेअर करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून छत्रपतींच्या शौर्याला नमन करत शिवजयंतीचा संदेश दिला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर पोस्ट करत छ्त्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp sambhaji raje bhosle greets on shiv jayanti appeals to follow shivaji maharaj ideals pmw