केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे जयंत पाटील यांच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण झालं होतं. पण, आपण अमित शाह यांची भेट घेतलेली नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. आता या चर्चांवर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

‘इंडिया’ आघाडीची बैठक पार पडणार आहे. त्यापूर्वी जयंत पाटील यांच्याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत, असा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “जयंत पाटील शनिवारी ( ५ जुलै ) ‘इंडिया’ आघाडीबद्दल झालेल्या बैठकीत उपस्थित होते. ही बैठक यशस्वी होण्यासाठी जयंत पाटील यांनी रविवारीसुद्धा ( ६ जुलै ) बैठका घेतल्या आहेत. आपला नेता आणि पक्ष संकटात असताना पळून जाणाऱ्या पळपूट नेत्यांपैकी जयंत पाटील नाहीत. जयंत पाटील आणि आमचा डीएनए एकसारखाच आहे. आम्ही पळपूट आणि डरपोक नाहीत.”

Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Ajit Pawar and Sanjay Raut
Sanjay Raut : “अजित पवार भावी किंवा माजी नाही, ते सदैव…”, उपमुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांचा टोला!
Rohit Patil on Sharad Pawar
Rohit Patil: “काहीही झालं तरी म्हाताऱ्याला…”, आबांच्या आईनं नातू रोहित पाटीलला शरद पवारांबद्दल काय सल्ला दिला?

हेही वाचा : हेही वाचा :

जयंत पाटील काय म्हणाले?

“अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा मी आणि माझ्याबरोबरचा एक सहकारी शनिवारी रात्री दोनपर्यंत घरीच बसलो होतो. मग पुण्याला कधी गेलो? शनिवारी आणि रविवारी मी शरद पवारांच्या घरीच होतो. मग मी कधी अमित शाहांना भेटलो? याचं संशोधन करा,” असे जयंत पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा : “राहुल गांधींना SCने न्याय दिला, पण…”, ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “गुजरातच्या भूमीवरून…”

“कुठे जायचं असेल, तर भेटून सांगेन. पण, विनाकारण बातम्या चालवल्या जातात. पक्ष मोठा व्हावा हा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मी आहे इथेच आहे. प्रसारमाध्यमचं इकडे जाणार, तिकडे जाणार असल्याचं सांगतात,” असेही जयंत पाटील म्हणाले.

Story img Loader