वाई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोजच्या धावपळीतून आपल्या गावी दरे तांब (ता महाबळेश्वर ) येथे आल्यावर आपल्या शेतात स्वतः शेतकरी बनून कामे करतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे दोन दिवस भात लावणीत मग्न झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गावी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे आल्यावर शेतीच्या कामात मग्न होतात. त्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे हे ही आता शेतीत भात लावणी करताना दिसून आले. आपल्या शेतात त्यांनी मशिंनच्या सहाय्याने चिखल केला. तर त्यापाठोपाठ त्यांनी भाताचा तरवा काढण्यासही मदत केली.चिखल करण्यासही ते मदत करत होते.

Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत

आणखी वाचा-राज्यात चार-पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

बऱ्याचदा उच्चपदस्थ मंडळी शेतीच्या नादाला लागत नाहीत परंतु मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाने आपल्या गावाची आणि शेतीची नाळ कधीही तोडली नाही. मी कोण वेगळा आहे असे न दाखवता ते नेहमी गावी आल्यावर शेतात झाडे लावणे, स्ट्रॉबेरी लागवड, भात शेती यांची कामे ते आस्थेवाईकपणे करतात. त्यामुळे आता मुख्यमंत्री झाले तरी एकनाथ शिंदे शेतात जात होते. काल आणि परवा खासदार श्रीकांत शिंदे गावी आले होते ते दोन दिवस भात लावणी करण्यात व्यग्र होते.

भातशेतीत मळ्यात वाढणारी भातरोपं, जिवंत बहरणारा हिरवा डोंगर आणि पावसाचा कणाकणात रुजण्याचा सोहळा हे सगळं पाहणे म्हणजे एक ऊर्जा असते. शेतीत राबताना त्या बळीराजाच्या कष्टाची जाणीव आपल्या हातात असलेल्या जबाबदारीची जाणीव देते. आज भाताची लावणी करताना तीच जाणीव प्रत्येक रोपात होती असे खा. श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा-मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरची जीपला धडक, सहा जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी

गुरेवासरे त्यांचा मुकेपणा, त्यांची माया हे सगळे अबोल असते पण तरीही ते खूप बोलके असते. हे गावपण अनुभवण्याचा एक वेगळाच आनंद आहे. निसर्गाचं हे देणं जगण्याचा भाग असणं यापेक्षा वेगळं भाग्य नाही.असे काम केल्यावर पुढील कामात आम्हाला नक्की ऊर्जा मिळते असेही ते म्हणाले.

Story img Loader