सावंतवाडी : महाविकास आघाडी हे लोकशाही मानणारे तर सध्याचे सरकार दडपशाही सरकार आहे. राज्यात दडपशाही सुरू असून तो रोखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ते राजीनामा देत नसतील तर तो मुख्यमंत्री यांनी घेतला पाहिजे असे मत महाविकास आघाडीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांच्या कामासाठी पद्मविभूषण देऊन गौरवणारे मोदी सरकारच होते. मग आत्ताच पंतप्रधान मोदींना पवारांनी शेतकऱ्यांसाठी काहीच काम केले नाही असा भास कसा काय झाला असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
तर नॅशनल करप्ट पार्टी म्हणून राष्ट्रवादीला हिणवणाऱ्या मोदींनी काल मात्र याबद्दल एकही शब्द का काढला नाही याचा अर्थ जनतेने समजून जावा असा टोलाही त्यांनी लगावला यावेळी गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा नाहीतर तो मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी टिकाही त्यांनी केली.
हेही वाचा >>> समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज; शरद पवार यांचे प्रतिपादन
खासदार सुप्रिया सुळे या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आल्या असता त्यांनी सावंतवाडी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबत संपर्क प्रमुख शेखर माने, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभागिय महीला अध्यक्ष अर्चना घारे परब, महिला जिल्हाध्यक्ष सौ रेवती राणे,काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत,अॅड. दिलीप नार्वेकर,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते.
सौ.सुळे म्हणाल्या, शिर्डी येथील दौऱ्यात शरद पवारांबद्दल पंतप्रधान मोदी काय बोलले हे मी ऐकले नाही त्यानंतर अनिल देशमुख यांनी काय स्टेटमेंट दिले ते सुद्धा ऐकले नाही त्यामुळे जे ऐकले नाही त्याबद्दल बोलणार नाही परंतु शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही असे ते बोलले तर शरद पवारांना कृषिमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाबद्दल पद्मविभूषण देऊन गौरवणारे हेच मोदी सरकार होते. दुसरीकडे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नॅशनल करप्ट पार्टी म्हणून नेहमी हिणवत होते, मात्र काल त्यांनी या संदर्भात चिक्कार शब्द काढला नाही याचा अर्थ काय तो येथील जनतेने समजून जावा. आज राज्यात मोठय़ा प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे दिवसाढवळय़ा किडनॅपिंग लोकांवर होणारे हल्ले गाडय़ांच्या तोडफोडी ड्रग्स आदी प्रकार पडत आहेत एकूणच गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा अन्यथा ट्रिपल इंजिन सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मागावा. ड्रग्स हा विषय राजकीय नाही तो सामाजिक विषय आहे त्यामुळे यावर कुठलेही राजकारण न करता तो गांभीर्याने घेतला जावा आम्ही सगळे सोबत राहू. सुळे पुढे म्हणाल्या, सावंतवाडी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता या ठिकाणी दोन वेळा मतदारांनी मोठय़ा मताधिक्याने राष्ट्रवादीचा आमदार निवडून दिला पुढे काय झाले याबाबत बोलणार नाही परंतु ज्या जनतेने आम्हाला भरभरून मतदान केले त्या जनतेचे आम्ही ऋणी आहोत व पुन्हा एकदा या ठिकाणी राष्ट्रवादी उभी करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील आमचे विचार जनतेमध्ये घेऊन सर्वसामान्यांसाठी आम्ही काम करू तर इंडिया महाविकास आघाडी म्हणूनच आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका लढवू. देशात राज्यात प्रचंड बेरोजगारी वाढली असताना राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात आहेत याला जबाबदार कोण असा सवाल करत उद्योग बाहेर जात असताना ट्रिपल इंजिन सरकार करते काय? तर कोकणात किंवा सिंधुदुर्गात प्रदूषणकारी प्रकल्प येत असतील तर आदी स्थानिक लोकांशी चर्चा झाली पाहिजे, लोकांना उद्ध्वस्त करणारे प्रकल्प येथे होऊ नये यासाठी नेते मंडळींनीही पुढाकार घेतला पाहीजे.
हेही वाचा >>> मराठा आरक्षण आंदोलन तीव्र; अंबादास दानवे, मुश्रीफ, मुंदडा यांना रोखले; प्रताप चिखलीकरांच्या वाहनावर दगडफेक
सुप्रिया सुळेंनी माझ्यावर बोलताना विचार करून बोलावे अन्यथा हा तुमची तक्रार शरद पवारांकडे करावी लागेल इशारा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे यांना दिला होता. याबाबत त्यांना छेडले असता मी त्यांच्याबद्दल बोललेच नाही. माझे बोलणे ते स्वत:ला लावून का घेतात असा पलटवार त्यांनी केला तर उलट केसरकर यांचा मला सल्ला आवडतो असेही म्हणत खिल्ली उडवली.
महाविकास आघाडीमध्ये चर्चा करून सावंतवाडीची जागा ठरव
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या जागेबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षातील मान्यवर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मुळात महाविकास आघाडीमध्ये लोकशाही आहे हुकुमशाही नाही. सगळय़ा पक्षातील कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यामुळे त्या संदर्भात चर्चा करूनच जागेबाबत निर्णय घेऊ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.