राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यंदाचा संसद महारात्न पुरस्कार जाहीर झाला आहे. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संसदेत भाषणं करून कामं होत नसतात, अशी टीका केली होती. त्यानंतर आज पुरस्कार जाहीर होताच सुप्रिया सुळे यांनी तो बारामती लोकसभेतील मतदारांना अर्पण केला. तसेच माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांच्या भाषणातील मुद्द्यावर टीका केली. “संसद आमच्यासाठी लोकशाहीचे मंदिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा जेव्हा खासदार म्हणून लोकसभेत आले तेव्हा त्यांनी लोकसभेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवलं. या संसद भवनात जेव्हा आम्ही येतो, तेव्हा देशाच्या कल्याणासाठी विविध विषयावर चर्चा करतो. देशासाठी जी नवीन धोरणे आखली जातात, ती याच लोकशाहीच्या मंदिरात. काही लोकांनी संसदेवर आणि तेथील चर्चेवर जी टीका केली, ती अयोग्य असून हा एकप्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

“भाजपाला जे ६० वर्षांत जमलं नाही, ते…”, रोहित पवार यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

AAP MLA Dinesh Mohaniya booked for flying kiss
Video: प्रचारादरम्यान महिलेला दिला फ्लाईंग किस; ‘आप’ आमदारांवर गुन्हा दाखल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Bombay HC urges Abhishek and Abhinandan to resolve trademark dispute
व्यापारचिन्हाबाबतचा वाद सौहार्दाने सोडवण्याचा प्रयत्न करा; उच्च न्यायालयाचा अभिषेक आणि अभिनंदन लोढा बंधुंना सल्ला
madhuri dixit praises hemant dhome fussclass dabhade movie
“हृदयस्पर्शी कथा…”, माधुरी दीक्षितकडून ‘फसक्लास दाभाडे’चं कौतुक, सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत ‘धकधक गर्ल’ म्हणाली…

माझ्यासारखा तगडा उमेदवार द्यावा

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात मी देईल, त्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन बारामतीमधील लोकांना दिले आहे. मी निवडणुकीला उभा आहे, असे समजून मतदान करा. जर लोकसभेला माझ्या उमेदवाराला मतदान नाही दिले, तर विधानसभेला मी उभा राहणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना निवडणुकीला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा असताना आता यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.

आज दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकशाहीमध्ये निवडणुकीसाठी कुणीतरी विरोधात उभे राहणारच. त्यांच्याकडे माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर जरूर त्यांनी उभा करावा. त्या उमेदवाराशी मी जाहीर चर्चा करायला तयार आहे. ते म्हणतील त्या ठिकाणी, कधीही आणि कोणत्याही विषयावर मी चर्चा करण्यासाठी तयार आहे.

‘सेल्फी घेऊन, संसदेत भाषणं ठोकून कामं होत नाहीत’, अजित पवारांकडून सुप्रिया सुळे लक्ष्य

राजकारणाला कौटुंबिक पातळीवर आणून ठेवले

“अजित पवार यांच्या भाषणानंतर मला वेदना झाल्या. राजकारण कौटुंबिक पातळीवर आणून ठेवलं आहे. माझं राजकारण कौटुंबिक नसून जनसेवेचं आहे. मी राजकारणात, समाजकारण चांगला बदल घडविण्यासाठी एक धोरणकर्ती म्हणून पुढे आले. बारामतीमधील लोकांनी मला तीन वेळा निवडून दिले. संसद हे लोकशाहीचे सर्वात मोठे मंदिर आहे. लोकशाहीसाठी अनेक महापुरुष लढले, त्याच लोकशाहीवर अविश्वास दाखवला गेला. हे अतिशय चिंताजनक आहे. हा देश लोकशाहीकडून दडपशाहीकडे जावा, अशी काहींची इच्छा आहे का? अशी शंका मनात येते”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

Story img Loader