राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यंदाचा संसद महारात्न पुरस्कार जाहीर झाला आहे. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संसदेत भाषणं करून कामं होत नसतात, अशी टीका केली होती. त्यानंतर आज पुरस्कार जाहीर होताच सुप्रिया सुळे यांनी तो बारामती लोकसभेतील मतदारांना अर्पण केला. तसेच माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांच्या भाषणातील मुद्द्यावर टीका केली. “संसद आमच्यासाठी लोकशाहीचे मंदिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा जेव्हा खासदार म्हणून लोकसभेत आले तेव्हा त्यांनी लोकसभेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवलं. या संसद भवनात जेव्हा आम्ही येतो, तेव्हा देशाच्या कल्याणासाठी विविध विषयावर चर्चा करतो. देशासाठी जी नवीन धोरणे आखली जातात, ती याच लोकशाहीच्या मंदिरात. काही लोकांनी संसदेवर आणि तेथील चर्चेवर जी टीका केली, ती अयोग्य असून हा एकप्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा