राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सासू ॲनी सुळे यांचं निधन झालं आहे. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, “माझ्या सासू ॲनी सुळे या आम्हाला काल सोडून गेल्या. त्या एक खंबीर, कणखर आणि प्रतिष्ठित महिला होत्या. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्याप्रती शोक व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानते.”

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या काकी भारती पवार यांचंही दोन आठवड्यांपूर्वी निधन झालं. या दुःखातून सावरत असतानाच त्यांच्या सासूबाईंचं निधन झालं आहे.