वाई : सुविधा हव्यात पण घरपट्टी नको, मग सुविधा कशा मिळणार, सुविधा हव्या असतील घरपट्टी द्यावी लागेल असे नागरिकांना निर्देश देत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून बिनबुडाच्या आरोपांना भीक घालत नाही अशी जोरदार टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा पालिकेने हद्दवाढ भागात आकारलेल्या घरपट्टीच्या अनुषंगाने शुक्रवारी आक्रमक होत् उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीने साताऱ्याची लूट केल्याचा आरोप केला होता त्याला उदयनराजे यांनी जल मंदिर येथे पत्रकार परिषदेत  जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी सातारा विकास आघाडीचे नेते सुनील काटकर व माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

सगळी सोंगे आणता येतात पैशाचे सोंग आणता येत नाही. सुविधा हव्यात पण घरपट्टी नको मात्र महसूल मिळायला हवा. काही महाभाग घरपट्टीच भरत नाहीत. मग सुविधा मिळणार कशा ? घरपट्टीच्या संदर्भाने टीका करणारे विद्वान असावेत, काही झाले की सातारा विकास आघाडीने लूट केली अशी टीका करायची असे सांगून ते म्हणाले, लोकांना सुविधा पुरवण्यासाठी सातारा विकास आघाडी स्थापन झाली आहे.तुमच्याकडे एकहाती सत्ता होती. तुम्ही काम केले नाही म्हणूनच आम्हाला भूमिका घ्यावी लागली. सातारकरांचा आमच्यावर विश्वास आहे, त्याला आम्ही पात्र ठरलो आहोत. हद्दवाढीसाठी आम्ही १२४ कोटी रुपयांचा निधी आणला मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही.

हेही वाचा >>> “सरकारच्या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्र मोडीत…”, रोहित पवार यांची राज्य सरकारवर टीका म्हणाले…

सुविधा हव्यात पण घरपट्टी नको, मग सुविधा कशा मिळणार,.सुविधा हव्या असतील घरपट्टी द्यावी लागेल . हद्दवाढीच्या भागात मुख्याधिकाऱ्यांना कॅम्प लावायला सांगितले आहे . घरपट्टीची बिले तेथे तपासून भरून घेतली जातील . काही लोक नुसतेच बिनबुडाचे आरोप करतात मात्र आरोप करताना तीन बोटे आपल्याकडे असतात. मात्र अशा आरोपांना आम्ही भीक घालत नाही असे ते म्हणाले . काही लोक पालिकेच्या कारभाराची चौकशी लावणार असतील तर अगदी ईडीच्या चौकशा लावा. कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे असे उदयनराजे म्हणाले.

हेही वाचा >>> “बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार प्रचार करतील”, हसन मुश्रीफांचं मोठं विधान

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांच्या संदर्भाने ते म्हणाले, या विषयावर काही तज्ञांनी पुरावे दिलेले आहेत त्यामुळे मी काही या विषयावर जास्त बोलणार नाही. मात्र वाघनखे इग्लंडला पाठविण्यात आली तेव्हा मी नव्हतो अशी मिश्किली उदयनराजे यांनी केली. मराठा क्रांती मोर्चाची जालना येथे शनिवारी सभा होत आहे, त्या संदर्भाने बोलताना उदयनराजे म्हणाले मराठा आरक्षण सभेला मी जाणार नाही. जात पात मी मानत नाही. दर दहा वर्षावर आरक्षण दिले पाहिजे. त्यावेळच्या राज्यकर्त्यांची चुकी आहे, असे ठाम मत आहे. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. तसेच आर्थिक निकषावर आरक्षणाचा विचार व्हावा असे ते म्हणाले.

Story img Loader