भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या स्टाईल आणि डायलॉगबाजीमुळे चर्चेत असतात. खास करुन कॉलर उडवत केलेली डायलॉगबाजीसाठी यापूर्वीही उदयनराजे चर्चेत राहिलेत. पुन्हा एकदा उदयनराजेंचा हाच अंदाज साताऱ्यातील एका कार्यक्रमात दिसून आला. कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे उदयनराजेंनी खास त्यांच्या स्टाइलने कॉलर उडवत डान्स करून कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण केली. उदयनराजेंसह कार्यकर्त्यांनी देखील या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.