जनतेची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांना आदर्श मानून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा, असा मोलाचा सल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिला. उदयनराजे भोसले मित्र समुहाच्यावतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्जवल यश मिळवलेल्या तीस विद्यार्थ्यांचा ‘जलमंदिर पॅलेस’ या उदयनराजेंचे निवासस्थानी शनिवारी सत्कार करण्यात आला.

यावेळी उदयनराजे म्हणाले, “तुमच्या पालकांची पुण्याई आणि समाजाचे नशीब म्हणून पुढील प्रशासकीय नोकरीच्या माध्यमातून जनतेची अविरत सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. तुम्हाला काहीही समस्या-प्रश्‍न निर्माण झाले तर आम्ही सदैव सहकार्याकरिता तत्पर आहोत. समाजाची सेवा करण्याकरिता प्रशासकीय अधिकाऱ्यांना फार मोठी संधी आहे. खडतर परिश्रम करुन एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या आपण सर्वांनी आपल्या नोकरीच्या कार्यकाळात निरपेक्ष भावनेने कार्य करावे. जनतेची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपला आदर्श मानून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा.” लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लाखो परिक्षार्थींमधून तुमची निवड झाली हे तुमच्या प्रयत्नांना मिळालेले यश आहे, अशा शब्दांत त्यांनी या विद्यार्थ्यांची पाठ थोपटली.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
State Bank of India fraud
तुमचंही SBI बँकेत अकाऊंट आहे का? मग जाणून घ्या एसबीआयनं दिलेली महत्त्वाची माहिती; अन्यथा क्षणात अकाउंट रिकामे
Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’
Decisions that protect the interests of consumers
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारे निकाल
My Portfolio Phoenix Mills Ltd
माझा पोर्टफोलियो : फिनिक्स मिल्स लिमिटेड
ipo investment
Initial Public Offer: गुंतवणूकदारांचा ‘आयपीओ’द्वारे २०२४ मध्ये विक्रमी १.२२ लाख कोटींचा भरणा
sensex gains 335 degrees on muhurat trading day
Muhurat Trading Day: सवंत्सर २०८१ बक्कळ लाभाचे… मुहूर्ताला सेन्सेक्सची ३३५ अंशांची कमाई

जलमंदिर हे सर्व जनतेचे घर

सर्वसामान्य जनतेमुळे आमचे राजेपण आहे. त्यामुळे जनतेसह तुम्हा सर्वांना जलमंदिर सदैव खुले आहे, अशी भावनाही यावेळी उदयनराजेंनी व्यक्त केली. यावेळी एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आलेला प्रसाद चौगुले यांसह प्रगती कट्टे, चैतन्य कदम, श्‍वेता खाडे, राहुल गुरव या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा दिवस नेहमीच स्मरणात राहील, अशी सामुहिक भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.