महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नव्या अर्ज प्रणालीवरील खाते अद्ययावत करण्यात अडचणी येत आहेत. हेल्पलाइनवर दूरध्वनी उचलला न जाणे, ई मेलला प्रतिसाद न मिळणे, अर्ज भरण्यासाठी पर्याय उपलब्ध न होणे, जुन्या किं वा सांकेतिक शब्दाद्वारे (पासवर्ड) खाते न उघडणे अशा अडचणी उमेदवारांना येत असून, या अडचणी सोडवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. पासवर्ड बदलून खाते अद्ययावत करता येत नसल्यामुळे मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी बदलून मिळावा याकरीता उमेदवारांकडून आयोगाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. त्यामुळे टोल फ्री क्रमांक सतत व्यस्त राहात आहे. त्यावर आता आयोगाने काही सूचना जारी केल्या आहेत. यामुळे उमेदवारांच्या अडचणी सोडवण्यात मदत होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in