महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. यामध्ये अभयसिंह मोहितेने ४७० गुण मिळवत राज्यातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. तर, समाधान शेंडगेने ४६६ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला असून, प्रशांत खेडेकर आणि विशाल साकोरे या दोघांनी ४६३ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला आहे. विशाल साकारेने ओबीसी प्रवर्गातूनही पहिला येण्याचा मान मिळवला. तर मुलींमध्ये वनश्री लाभसेटवार हिने ४२५ गुण मिळवत बाजी मारली आहे.
मुळचा सोलापूर जिल्ह्याचा असणाऱ्या अभयिसंह मोहितेने या यशानंतर आनंद व्यक्त करताना कठोर मेहनतीमुळेच हे यश मिळाल्याचे सांगितले. अभयसिंह मोहिते तिसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

Story img Loader