सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पेटलेल्या आंदोलनाचा मोठा फटका एसटी बससेवेला बसला असून सोलापूर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून एसटी बससेवा ठप्प आहे. त्यामुळे एसटी  महामंडळाला सुमारे एक कोटीचे नुकसान सहन करावे लागले आहे. सामान्य प्रवासी आणि बससेवेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> “ज्या लॉजवर मला मारण्याचा कट…”, आमदार प्रकाश सोळंकेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “मराठ्यांनीच मला वाचवलं”

गेल्या ३१ आॕक्टोंबरपासून सोलापूर जिल्ह्यात एसटी बससेवा बंद आहे. मागील चार-पाच दिवसांत चिघळलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सार्वजनिक मालमत्तांसह एसटी बसेस जाळण्याचे आणि दगडफेक करून नुकसान करण्याचे प्रकार घडले. यात २५ बसेसचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोलापूर आगारासह संपूर्ण जिल्ह्यात अकरा आगारांतील एसटी बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. सोलापूर आगारातून दररोज ४५० बसेस धावतात. तर अन्य जिल्ह्यांसह शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून मिळून सुमारे ३५०० एसटी   बसेस सोलापुरातून ये-जा करतात. पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आदी धार्मिक पर्यटनस्थळी देवदर्शनासाठी येणा-या भाविकांचाही ओघ मंदावला आहे. त्यामुळे कोट्यवधींच्या होणा-या उलाढालीवर परिणाम होत आहे. दिवाळी तोंडावर आली असताना बाजारपेठा फुलण्याची अपेक्षा असताना त्यावरही परिणाम होत असल्यामुळे व्यापारीवर्गाला चिंता सतावत आहे.

हेही वाचा >>> वांरवार राजकीय भुमिका बदलणाऱ्या जयंत पाटीलांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये, सुनील तटकरे यांचा शेकापला टोला….

सोलापूर हे वैद्यकीय सेवेसाठी ओळखले जाते. संपूर्ण जिल्ह्यासह शेजारच्या मराठवाड्यातून तसेच कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बीदर आदी भागातून हजारो रूग्ण वैद्यकीय उपचाराची सेवा घेण्यासाठी सोलापुरात येतात. परंतु एसटी बससेवा बंद असल्यामुळे रूग्णांची सोलापुरात येण्याची संख्या घटली  आहे. दुसरीकडे एसटी सेवा बंद असल्याचा फायदा उकळत खासगी प्रवासी बस वाहतुची अक्षरशः चांदी होत आहे. खासगी प्रवासी बसभाडे प्रचंड वाढले आहे. सोलापुरातून दररोज पुणे व मुंबईसह हैदराबाद, नागपूर, औरंगाबाद आदी दूरच्या महानगरांसाठी सुमारे ७० खासगी आराम बसेस धावतात. मात्र प्रवासीभाडे वाढल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांनाच सहन करावा लागत आहे. रेल्वेसेवेवर जास्त ताण वाढला आहे.