राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जी वक्तव्यं केली त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातच ही बाब होती की राज्यपालांनी पायउतार झालं पाहिजे. आम्हाला राज्यपाल तोंडी सांगत होतेच की मुझे जाना हैं.. आता आज त्यांनी लेखी लिहून दिलं आहे की मला पदावर राहायचं नाही. आता तरी पंतप्रधान आणि राष्ट्रपती योग्य तो निर्णय घेतील असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे राज्यपालांनी पत्रात?

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Sanjay Raut On Dhananjay Munde and PM Modi Mumbai Visit
Dhananjay Munde : “…मग धनंजय मुंडेंवर अन्याय का?”, PM मोदींच्या कार्यक्रमापासून दूर ठेवल्याच्या मुद्यावर राऊतांचा थेट सवाल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Case
Dhananjay Deshmukh : “…अन्यथा टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार”, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”

महाराष्ट्राचे राज्यपाल हे पहाटेच्या शपथविधीपासून चर्चेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पहाटे शपथ घेतली होती. त्याची बरीच चर्चा रंगली होती. तेव्हापासून सातत्याने राज्यपाल हे वादात अडकलेले दिसत होते. कोव्हिड काळातही त्यांनी मंदिरं उघडा म्हणून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला पत्र लिहिलं होतं. त्यावरून बराच वाद झाला होता.

एवढंच नाही तर राजस्थानी आणि गुजराती नसते तर मुंबईकरांकडे पैसेच राहणार नाही. महात्मा फुले यांच्या विषयीचं वादग्रस्त वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतचं वक्तव्य. या सगळ्यामुळे राज्यभरात राज्यपालांच्या विरोधात आंदोलन झालं होतं. महाविकास आघाडीने मागच्या महिन्यात राज्यपालांना हटवण्याची मागणी करत आंदोलनही केलं होतं. आता जयंत पाटील यांनी विचारलं असता आम्हाला काही दिवसांपासून राज्यपाल हे सांगत होते की मुझे जाना है अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

Story img Loader