डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर राज्य सरकार काय करणार, असा प्रश्न अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्या आणि दाभोलकरांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनी गुरुवारी उपस्थित केला. राज्यातील भाजपचे सरकार त्यांची नैतिक जबाबदारी काय मानतात, असेही त्यांनी विचारले आहे.
पानसरे यांच्यावरील हल्ल्याला चार दिवस उलटल्यानंतरही आरोपी अजून मोकाट आहेत, याकडे लक्ष वेधून त्यांनी थेट राज्य सरकारलाच प्रश्न विचारला. त्यावेळी सरकारच्या राजीनाम्याची मागणी करणारे आता स्वतःची नैतिक जबाबदारी काय मानतात, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राने पुरोगामी हे विशेषण वापरूच नये, असेही मत त्यांनी मांडले.
आणखी वाचा