मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठरत असेलेला चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना मारहाण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून हा चित्रपट गेल्या काही दिवसापासून सतत या ना त्या कारणाने चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातच आता चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना काही अज्ञातांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या पौड येथील कार्यालयामध्ये काही अज्ञातांनी प्रवेश करत कार्यालयाची तोडफोड करुन प्रवीण तरडे यांना धक्काबुक्की केली. मात्र मला कोणतीही मारहाण झाली नसून मी ठिक असल्याची प्रतिक्रिया प्रवीण तरडे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ प्रकृती बिघडल्याने बॉम्बे रुग्णालयात, पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यातून करण्यात आलं एअरलिफ्ट
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Change in criteria in allotment of plots of institutions related to ChandraShekhar Bawankule print politics news
पाच कोटींची जमीन दीड कोटीत बहाल; बावनकुळे यांच्याशी संबंधित संस्थेच्या भूखंड वाटपात निकषबदल
Wardha, P M Vishwakarma Yojana, artisans,
देशी कारागिरांना भरभरून प्रतिसाद, तब्बल दहा लाखाची विक्री
village extension officer arrested by acb while accepting bribe
नाशिक : जळगावमध्ये लाच स्वीकारताना ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात
There is no anti encroachment team action of the Municipal Corporation against the welcome boards of CIDCO Chairman
सिडको अध्यक्षांच्या स्वागत फलकांनी बेलापूर विद्रूप; महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक गप्प
student wing agitation
‘वंचित’कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत लक्ष्य
Murder of petrol pump owner of Virar two accused arrested by crime branch team
विरारच्या पेट्रोलपंप मालकाची हत्या, गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोन आरोपींना अटक

‘मी पौडमधील माझ्या कार्यालयामध्ये असताना आमच्या मुळशी गावातील काही अज्ञात मुलांनी माझ्या कार्यालयात प्रवेश केला आणि कार्यालयाची तोडफोड केली. मात्र मला कोणतीही मारहाण करण्यात आली नसून केवळ धक्काबुक्की झाली आहे. पण मी ठिक आहे’, असं प्रवीण तरडे म्हणाले.

पुढे ते असंही म्हणाले, ‘मुळशी पॅटर्न हा चित्रपट एखाद्या गुन्हेगाराच्या जीवनावर चित्रीत करण्यात आल्याचा समज काही अज्ञात व्यक्तींना झाला होता. त्यामुळे त्यांनी कार्यालयात येऊन हा धुमाकूळ घातला. मात्र या अज्ञातांचा जो काही  गैरसमज होता तो मी दूर केला आहे. माझ्या मुळशी पॅटर्न या चित्रपटामध्ये शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली आहे.

दरम्यान, तरडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून देखील या घटनेचा खुलासा केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र तरडे यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी पोहचले असून आधिक तपास करण्यात येत आहे.