वाई : वाईच्या महाविद्यालयात किसन वीर महाविद्यालय परिसरामध्ये ‘क्रिसिला’ हा दुर्मीळ जातीचा विविध रंगी कोळी आढळला आहे. ‘क्रिसिला’ हा ‘सॅल्टीसिडे’ कुटुंबातील उडी मारणाऱ्या कोळय़ांच्या प्रजाती मधला आहे. हा दुर्मीळ कोळी संशोधकांसाठी कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय होत आहे.

किसन वीर महाविद्यालय परिसर हा पाचगणीच्या पायथ्याला सोमजाई डोंगराच्या पायथ्याशी खोलगट ओढय़ाच्या काठी वसलेला आहे. या परिसरात अत्यंत दुर्मीळ झाडे, गवत, वेली आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात आवड निर्माण होण्यासाठी व संशोधनासाठी प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व जीवशास्त्र विभागासाठी ही प्रयोगशाळा विकसित केली आहे. हा कोळी गवत, छोटी झाडे, जमीन, झाडाची साल, पाने, फळे या जागी आढळतो. झाडावरील छोटे उपद्रवी कीटक यांचे खाद्य असते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हे कीटक खूप मदत करतात. अशाच ठिकाणी हा बहुरंगी कोळी आढळला आहे. जगामध्ये सर्वत्र अनेक प्रकारचे प्राणी आढळतात.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
white onion Alibaug, Raigad, white onion,
रायगड : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार, एक हजार हेक्टरवर पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
Gondia known as Maharashtra s granary sees farmers shifting towards maize and gram this rabi season
धानाचे कोठार, पण शेतकऱ्यांचा कल मका, हरभऱ्याकडे
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
Farmer Viral Video
शेतकऱ्यांनो तुम्हीही कांद्याचं पिकं घेतलंय का? वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्
Cucumber, flower, brinjal, carrot,
पुणे : काकडी, फ्लॉवर, वांगी, गाजर स्वस्त

काही रंगीबेरंगी असतात तर काही पूर्णपणे रंगहीन असतात. काही खूप मोठे असतात तर काही इतके लहान असतात की, डोळय़ांना नीट दिसतही नाहीत. अशा वेगळय़ा जातीतील हा बहुरंगी कोळी आहे. प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हणमंतराव कणसे आणि प्रा. राहुल तायडे याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की, ‘क्रिसिला’ हा कोळी सॅल्टीसिडे कुटुंबातील आहे. उडी मारणाऱ्या कोळय़ांच्या प्रजातीमधला आहे. ज्याचे वर्णन प्रथम १८८७ मध्ये डॉ. थोरेल यांनी केले होते. या प्रजातीमधील मादी २ ते ४ मिलिमीटर आणि नर ४ ते ९ मिलिमीटर लांब असतो. त्यांच्या अंगावर लाल, हिरवे, नारंगी रंगाचे दोन इंद्रधनुषी निळे पट्टे असतात. या किटकास ८ पाय असून; ते पिवळय़ा रंगाचे असतात.  याबाबत कीटकांवर संशोधन करणारे डॉ. विश्वास देशपांडे यांनी सांगितले की, जगामध्ये आजपर्यंत ५१,२९३ प्रकारचे कोळी सापडले आहेत. यामध्ये ६७४ वर्ग आणि १३२ कुटुंब त्यापैकीच हा दुर्मीळ ‘क्रिसिला’ कोळी आहे.

Story img Loader