अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या शिवसैनिक, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी आपल्यातून निघून गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रमेश लटके यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.

नक्की वाचा >> शिवसेना आमदाराचं दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन : वृत्त समजल्यानंतर नितेश राणे म्हणाले, “काही महिन्यांपूर्वीच…”

“आमदार रमेश लटके लढवय्या शिवसैनिक होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी आपल्या कामाने लोकांची मने जिंकली होती. त्याच जोरावर ते आता सलग दोनदा अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करत होते,” असं मुख्यमंत्र्यांनी लटके यांच्या आठवणी जागवताना शोकसंदेशामध्ये उल्लेख केलाय.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
dubai visa policy
दुबईचा व्हिसा मिळवताना भारतीय पर्यटकांना अडचणी का येत आहेत? काय आहेत नवे नियम?
Green chillies from Vidarbha, Green chillies,
विदर्भातील हिरवी मिरची थेट दुबईच्या बाजारात
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Raghunath More, Raghunath More passed away,
शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी

“चांगला संपर्क असणारा, विकास कामांचा ध्यास घेतलेला, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. त्यांचे अकाली निधन हा त्यांच्या कुटुंबीयांवर आघात आहे. लटके कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आमदार रमेश लटके यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असं मुख्यमंत्र्यांनी लटके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलंय.

बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने लटके यांचं दुबईमध्ये निधन झालं. आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी लटके हे सहकुटुंब दुबईला गेले होते तेव्हाच हा प्रकार घडला. रमेश लटके हे ५२ वर्षांचे होते. लटके यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांचे कुटुंबिय शॉपिंगसाठी गेले होते अशी माहितीही मिळत आहे. सध्या त्यांचे पार्थिव दुबईवरुन मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी, “आम्ही सध्या पार्थिव देशात परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती दिलीय.

२०१४ मध्ये काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांना पराभूत करुन लटके हे अंधेरी पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले होते. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार असणाऱ्या एम पटेल यांना पराभूत केलं होतं. यापूर्वी ते अनेक वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत होते. लटके यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अंधेरीमधील लटके यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांची गर्दी होण्यास सुरुवात झालीय. 

Story img Loader