मुंबईतील आर्थर रोड कारागृह भारतातील सर्वात चर्चेत असलेला कारागृह आहे. या कारागृहात एका वेळी ८०४ कैदी राहू शकतात. मात्र मुंबई शहर जसे गजबजलेले आहे अगदी तशाच पद्धतीने या कारागृहातदेखील कैद्यांची मोठी गर्दी आहे. या कारागृहाची क्षमता ८०४ कैद्यांची असली तरी येथे सध्या ३००० कैद्यांना ठेवण्यात आलंय. २०१८ साली विजय माल्याचे प्रत्यापर्ण करण्याची मागणी होत असताना माल्याच्या वकिलांनी भारतीय तुरुंगातील याच स्थितीचा उल्लेख करत माल्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने याबाबतचे सविस्तर वृत्त दिलेले आहे.

हेही वाचा >>> “पंडितजी आतापर्यंत आम्ही पाच जणांना मारलंय,” भाजपाच्या माजी आमदाराचे धक्कादायक विधान

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळवीर भरतीय कारागृह आणि आर्थर रोड तुरुंगाच्या परिस्थितीवर टीका होऊ लागल्यानंतर येथे १२ नंबरची विशेष कोठडी तयार करण्यात आली. आर्थर रोडवर असलेल्या या तुरुंगाची निर्मिती १९२५ साली करण्यात आली. या तुरुंगाच्या भिंती दगड आणि काँक्रिटच्या आहेत. असे असले तरी या तुरुंगातील १२ नंबरची कोठही कारागृहाच्या दुनियेत एखाद्या फाईव्ह स्टार हॉटलपेक्षा कमी नाही.

हेही वाचा >>> पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी

आर्थर रोड कारागृहात असलेली १२ क्रमांकाची कोठडी ही या तुरुंगातील विशेष कोठडी आहे. या कोठडीत आतापर्यंत मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब, बॉलीवूड अभिनेता संजय दत्त, स्टार टीव्हीचे सीईओ पीटर मुखर्जी तसेच पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी विपुल अंबानी आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​वाधवान बंधू कपिल आणि धीरज यांना ठेवण्यात आले आहे. हीच कोठडी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागील काही दिवसांपासून येथे वेगवेगळे कैदी ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनादेखील याच कोठडीत ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा >>> मनिष सिसोदियांवरील कारवाईवरून अरविंद केजरीवालांची पुन्हा मोदी सरकारवर टीका; म्हणाले,“तर देशाची प्रगती…”

आर्थर रोड तुरुंगात सध्या अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत असे महाराष्ट्रातील तीन बडे नेते आहेत. या नेत्यांच्या आजूबाजूला कधीकाळी नोकर आणि सहायकांचा लवाजमा होता. कारागृहात मात्र तसे काहीही नाही. संजय राऊत या कारागृहात कैदी क्रमांक ८९५९ असून ते त्यांचा पूर्ण दिवस वर्तमानपत्रे वाचणे, कारागृहातील ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचणे तसेच कोठडी क्रमांक १२ मधील एलईडी टीव्ही पाहण्यात घालतात.

हेही वाचा >>>“मंत्रिपदासाठी अजून काय काय करावे लागणार”; देवेंद्र फडणवीसांच्या रक्ततुलेवरुन अमोल मिटकरींचे राणा दामपत्याला खोचक टोला

आर्थर रोड येथील तरुंगात एका वेळी ८०४ कैदी राहू शकतात. मात्र येथे सध्या ३००० कैदी राहतात. यातील ५४० कैद्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा यासारख्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. तर ४०० पेक्षा जास्त कैद्यांवर खुनासारखे गंभीर आरोप आहेत. यातील ८० कैद्यांवर अतिरेकी कारवाया केल्याचा आरोप आहे. तर १४० विदेशी नागरिक ड्रग्स तस्करीसारख्या गुन्ह्यांमध्ये कारागृहात आहेत. असे असले तरी येथील १२ क्रमांकाची कोठडी विशेष आहे.

हेही वाचा >>> “हिंदूंमुळेच हिंदुस्थान, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा,” महात्मा गांधींना शिवीगाळ करणाऱ्या कालीचरण महाराजाची नवी मागणी

१२ क्रमांकाच्या कोठडीत काय विशेष आहे?

“या कोठडीत सकाळी सात वाजता चहा येतो. त्यानंतर लगेच नाश्ता दिला जातो. ११ वाजपेर्यंत दुपारचे जेवण येते. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता पुन्हा एकदा चहा दिला जातो. रात्री आठ वाजता रात्रीचे जेवण दिले जाते,” ईडीने अटक केलेल्या अनिल देशमुखांची बाजू मांडणारे वकील इंद्रपाल सिंह यांनी ही माहिती दिली. “या कोठडीत असणाऱ्या कैद्याला ४५०० रुपये मासिक भत्ता दिला जातो. या पैशांमधून त्यांना कारागृहातील कँटिनमधून स्नॅक्स, बिस्किट, साबण, शांपू अशा सामानांची खरेदी करता येते. अनिल देशमुख यांच्या पाठीला त्रास आहे. त्यामुळे त्यांना खाली नीट झोपता येत नसल्यामुळे त्यांना बेड देण्यात आलेला आहे,” असेदेखील इंद्रपाल सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “खरा धृतराष्ट्र कोण हे महाराष्ट्राने पाहिलं, शेवटी महाभारत..,” शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनंतर आता भाजपाच्या चित्रा वाघ आक्रमक

विशेष म्हणजे या १२ क्रमांकाच्या कोठडीत एकूण तीन फॅन, सहा ट्यूबलाईट्स, पाच व्हेंटिलेटर्स, तीन खिडक्या आहेत. तसेच या कोठीमध्ये ३८.५ मीटरची मोकळी जागा देण्यात आली आहे. येथे कैदी व्यायाम करू शकतात. आर्थर रोड तुरुंगातील १२ नंबरची कोठडी ही कारागृहाच्या दुनियेतील पंचतारांकित हॉटेलच आहे.