माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांनीच मला १०० कोटीच्या वसुली प्रकरणात अडकवलं असा आरोप केला. त्याआधी सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना उत्तर देत मी परमबीर सिंग आणि सचिन वाझेची नियुक्ती केली नव्हती असं म्हटलं आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना सचिन वाझेने कॅमेरा समोर येत अनिल देशमुख पी.ए. मार्फत पैसे घ्यायचे असा आरोप पुन्हा केला. तसंच परमबीर सिंग ( Parambir Singh ) यांनीही प्रतिक्रिया दिली आणि अनिल देशमुख वसुली करत होते आणि त्याची कल्पना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना होती असं म्हटलं आहे.

परमबीर सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाल्याचा आरोप

यानंतर अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाल्याचा आरोप केला. या आरोपांना परमबीर सिंह यांनी उत्तर तर दिलंच मात्र आता त्यांनी या प्रकरणात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचंही नाव घेतलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अनिल देशमुख यांच्या वसुलीबाबत मी कल्पना दिली होती. मात्र त्यांनी काहीच केलं नाही असं परमबीर सिंह (Parambir Singh ) यांनी म्हटलं आहे.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…

हे पण वाचा- Parambir Singh : परमबीर सिंह यांचं अनिल देशमुखांना खुलं आव्हान; म्हणाले, “चला समोर या आपण दोघं..”

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काय म्हटलंय?

“अनिल देशमुख हे माझ्यावर अचानक आरोप करत असल्याने मी चकीत झालो आहे. तीन वर्षांपासून काहीही नव्हतं अचानक ते अनिल देशमुख हे सांगत आहेत की मी देवेंद्र फडणवीसांशी डील केलं. मला अनिल देशमुख टार्गेट करत आहेत कारण त्यांचं मानसिक संतुलन ढळलं आहे. त्यांना आलेल्या नैराश्यातून ते असे आरोप करत आहेत. अनिल देशमुख यांनी सोनू जलान आणि रियाज भाटी या दोन गुन्हेगारांची मदत घेऊन माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले. हे दोघं बऱ्याचवेळा संजय पांडेंच्या मदतीने अनिल देशमुख यांची भेट घ्यायचे. संजय पांडे यांनीही मला मी लिहिलेलं पत्र मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता.” असं परमबीर सिंह (Parambir Singh ) यांनी म्हटलं आहे.

Parambir Sing News
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांना थेट आव्हान दिलं आहे. हे आव्हान आता अनिल देशमुख स्वीकारणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरेंना वसुलीची कल्पना होती

Parambir Sing म्हणाले, “अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी त्यावेळी माझी भेट घेतली ते म्हणाले की १०० कोटींच्या वसुलीसंदर्भात तुम्ही जे पत्र लिहिलं आहे ते मागे घ्या. आम्ही तुम्हाला पोलीस महासंचालक करु अशी ऑफर त्याने मला दिली. तो माझ्या पाया पडला होता. तसंच जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. ते सगळे पैसे पार्टी फंडसाठी जात होते. मी जे आरोप केले आहेत ते फक्त १० टक्के किंवा २० टक्के भाग आहे. बाकी खंडणीची अनेक प्रकरणं आहेत. या सगळ्या गोष्टी मी शरद पवार आणि त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना भेटून या सगळ्या वसुलीची माहिती दिली. मात्र त्यांनी याकडे डोळेझाक केली. कारण त्यांना हे सगळं आधीच माहीत असावं असं मला वाटतं, असा आरोप परमबीर सिंह (Parambir Singh ) यांनी केला. मुंबई तक या पोर्टलला फोनद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेत परमबीर सिंह (Parambir Singh ) यांनी हा आरोप केला.

Story img Loader