अलिबाग : मुंबई गोवा महामार्गावर उद्या आणि परवा ब्लॉक घेतले जाणार आहेत. वाहतुक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची वाहतुक अधिकसुचना जारी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलाड जवळील पूई येथे नवीन पूलाचे सध्या सुरू आहे. या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतला जाणार आहे. १८ आणि १९ जुलै या दोन दिवसात हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी बारा ते सायंकाळी चार या कालावधीत हे ब्लॉक असणार आहे. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक बंद ठेवली जाणार आहे. प्रवाश्यांनी तसेच वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा….दापोली : गुरांची अवैध वाहतुक पकडली, दाभोळ पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल

गेल्या १२ वर्षांपासून पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. रंदीकरण पूर्ण झाले असले तरी कासू ते इंदापूर टप्प्यातील पूलांची कामे रखडली आहेत. ही कामे आता मार्गी लावली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कोलाड जवळील पूई येथील नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पूलाचे गर्डर टाकण्याचे काम १८ आणि १९ जूलै दरम्यान केले जाणार आहे. यासाठी सहा मोठे गर्डर आणण्यात आणण्यात आले आहेत.

गर्डर बसविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीही पूलाजवळ दाखल झाल्या आहेत. हे काम करतांना वाहतुक बंद ठेवणे गरजेचे असल्याने ठेकेदार तथा महामार्ग विभागामार्फत वाहतुक महासंचालकांकडे वाहतूक बंद ठेवणेबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार वाहतुक विभाग अप्पर पोलीस माहसंचालक कार्यालयातील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे याबाबतची वाहतूक प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी केली आहे.

हेही वाचा….Reel Star Aanvi Kamdar : कुंभे धबधबा येथे इन्स्टाग्रामवर रीलस्टार करतांना दरीत पडून रिलस्टार अन्वी कामदारचा मृत्यू

पर्यायी मार्ग कोणते…

-वाकण पाली येथून वाहतूक भिसेखिंड, रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर जाता येईल.

-वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवाळजे, निजामपूर माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल.

-या शिवाय खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्ग ला पुढे जाता येईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai goa highway to face blocks on 18 and 19 july for bridge construction near kolad psg