गणेशोत्सव आता अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था कायम आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मात्र चच्रेची गुऱ्हाळे करण्यात मग्न आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता महामार्गावरील खड्डय़ांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जारी केले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाची २० ऑगस्टपूर्वी दुरुस्ती करण्याची वेळ आता संपली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खड्डे भरण्याचे काम योग्य प्रकारे करीत नसल्याने जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे भरण्याची विनंती केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानेही अद्याप फारशी हालचाल केलेली नाही. त्यामुळे महामार्गाची दुरवस्था मात्र कायम आहे. अजूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्त्यावरील खड्डे भरेल, असा आशावाद जिल्हा प्रशासनाला वाटतो. महामार्गाची दुरवस्था आणि वाहतूक नियमनासाठी दिवसागणिक बठका होत आहेत. चच्रेची गुऱ्हाळे रंगत आहेत. मात्र खड्डे भरण्याच्या कारवाईची बोंब असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सचिन अहिर यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसह शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला. जिल्हा प्रशासनाचा लवाजमा या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होता. उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी सुमंत भांगे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण िशदे, पोलीस अधीक्षक एस. के. महावरकर, वाहतूक पोलीस शाखेचे निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कामत हेदेखील या वेळी उपस्थित होते. महामार्ग प्राधिकऱ्याच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा खड्डे तातडीने बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा खड्डे न बुजवल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला.
या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा एकदा आढावा बठक घेण्यात आली. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी चर्चाही झाली. यानंतर महामार्गाच्या खड्डय़ांचे सर्वेक्षण करण्याचा फतवा जारी करण्यात आला. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुक्यात एक कमिटी स्थापन करण्याचा निर्णय झाला. यात वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि िपट्र मीडियाचा एक पत्रकार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील या पथकाने रविवारी सकाळपासून महामार्गावरील खड्डय़ांचे सर्वेक्षण करावे, खड्डय़ांचे व्हिडीओ चित्रण तसेच छायाचित्रण करावे आणि संध्याकाळी अहवाल अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.
या सर्वेक्षणामुळे नेमके किती खड्डे बुजवले याचे सत्यशोधन करणे शक्य होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मात्र गेल्या २ ऑगस्टपासून महामार्गाच्या दुरवस्थेबाबत नुसत्या चर्चा आणि बठकांचे आयोजन केले जाते. पालकमंत्री सचिन अहिर यांनी तब्बल तीन वेळा या संदर्भात बठका घेतल्या आहे. बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भात बठक घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रायगड दौऱ्यात या महामार्ग दुरवस्थेचा आढावा घेतला आहे. अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनीही एक बठक घेतली आहे, पण महामार्गावरील खड्डे अद्याप भरले गेलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नुसत्याच चर्चा आणि कारवाईची बोंब, अशी संतप्त प्रतिक्रिया रायगडकरांमध्ये उमटत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा