सातारा : पंतप्रधान कार्यालयात सुरक्षा सल्लागारपदी कार्यरत असल्याची बतावणी करून लोकांना गंडा घालणारी साताऱ्यातील जोडी कश्मिरा पवार व गणेश गायकवाड या दोघांच्या सातारा पोलिसांच्या तपासाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने शंका उपस्थित करत सातारा पोलिस अधीक्षकांना ११ जुलै रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. श्याम सी चांडक यांच्या खंडपीठाने यासंदर्भात ३ जुलै २०२४ रोजी सुनावणी करताना हा आदेश दिला. हा गुन्हा सीआयडी किंवा सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका दाखल झाल्याने सुनावणी दरम्यान हा आदेश देण्यात आला. याचिकाकर्ते पुण्यातील व्यावसायिक फिलीप भांबळ यांनी सातारा येथे डिसेंबर २०२२ मध्ये कश्मिरा पवार आणि तिचा सहकारी गणेश गायकवाड यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता.सातारा शहर पोलिसांनी ४ जानेवारी २०२३ रोजी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गून्हा नोंद केला.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल, “गद्दार झालो तरीही चालेल पण खुर्ची…”

त्यानंतर १० जानेवारी २०२३ रोजी, काश्मिराच्या तक्रारीनंतर, सातारा पोलिसांनी भांबळ, गोरख मरळ आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध ५० लाख रुपयांची मागणी केल्याबद्दल आणि त्यांच्यातील आर्थिक वादानंतर तिच्याकडून ५० हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल केला.भांबळ यांनी न्यायालयाच्या निदर्शनासाठी आणले की, मी तक्रारदार असताना पोलिस कर्मचारी राहुल घाडगे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मला सातारा पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटली आणि या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा सीबीआयकडे वर्ग करावा अशी विनंती करणारी फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयासमोर दाखल केली.या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला. याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केले आहे.

सातारा पोलिसांनी कश्मिरा पवार व गणेश गायकवाड यांना मागील महिन्यात ताब्यात घेतले होते. या प्रकरणात ८२ लाखांच्या फसवणूकप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. त्यांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडी नंतर जामीन मंजूर करण्यात आला ही बाब त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंसाठी हे सगळं सहन करू”, राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज? म्हणाले, “माझा दोन वेळा…”

कश्मिरा पवार व गणेश गायकवाड यांनी सातारा, वाई, महाबळेश्वर, फलटण, कोरेगाव, कराड येथील अनेक धनिकांना वेगवेगळी कामे करतो असे सांगून फसवणूक केली आहे.आपल्या नावाची चर्चा नको बदनामीच्या भीतीने या धनिकांनी पोलिसात कोणतीही तक्रार केलेली नाही. मात्र याबाबत पोलीस पातळीवर तपास अद्याप सुरू आहे.

हेही वाचा : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या निवासस्थानी, बाहेर आल्यानंतर कारणही सांगितलं; म्हणाल्या, “मी आज..”

करोना प्रादुर्भावात रुग्णांना जिवंत दाखवून आमदार जयकुमार गोरे व इतरांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोप करत त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करणारी याचिका मायणी (ता खटाव) येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सुनावणी करताना न्या रेवती मोहिते डेरे आणि न्या एस सी चांडक यांच्या खंडपीठाने सातारा पोलीस अधीक्षकांना दि २२ जुलै रोजी उच्च न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai high court orders superintendent of police to present in court in two cases css
Show comments