रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गाजलेल्या फैय्याज हकीम या तरुणाचा निर्घृण खून प्रकरणात अटक असलेल्या सचिन जुमनाळकर या आरोपीने सुटकेसाठी केलेला विनंती अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. फैय्याज हकीम या तरुणाचा निर्घृण खून करणारा आरोपी सचिन भीमराव जुमनाळकर याने आतापर्यंत १४ वर्षे शिक्षा भोगली आहे. त्याने स्वतःच्या सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे विनंती अर्ज केला होता. हा विनंती अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर खासदार नारायण राणेंचे फोटो न छापल्याने भाजपा – शिवसेनेत पुन्हा वाद

हेही वाचा – Amol Kolhe : “गुलाबी रंगाची पुंगी वाजवून…”, अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका; म्हणाले…

शासन नियमाप्रमाणे २६ वर्षे शिक्षा भोगणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने निर्णयात नमूद केले आहे. शहरातील बेलबाग चौकानजीक फेब्रुवारी २००७ रात्री हकीम याचा खून झाला होता. या प्रकरणी सचिन भीमराव जुमनाळकर, फाईब मुशताब करंबळेकर, रफीक अब्दुल रहिमान शेख यांना पोलिसांनी अटक केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय सातार्डेकर यांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. येथील सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यात तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.