Maharashtra- Mumbai Heavy Rain Alert : हवामान विभागाने आज मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.

मुंबईत सकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल साधारण १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर बघता जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण आणि मदत कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात सर्वत्र पावसाने चागंली हजेरी लावली आहे.

दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट केलं असून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरु असल्याचं सांगत आहेत याचं आश्चर्य वाटतं, जर बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं असं सांगत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. या सर्व घडामोडींचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra Breaking News Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

21:13 (IST) 13 Jul 2022
VIDEO: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी; निलेश राणे-दीपक केसरकरांनी काढली एकमेकांची लायकी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. यानंतर आता राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नवीन सरकार अस्तित्वात आलं आहे. शिंदे गट आणि भाजपाचं सरकार म्हणजे नैसर्गिक युती असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे. असं असताना आता शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. भाजपा नेते निलेश राणे आणि दीपक केसरकर यांनी एकमेकांची लायकी काढली आहे. सविस्तर बातमी

20:11 (IST) 13 Jul 2022
पुणे : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ‘या’ गड-किल्ले, पर्यटनस्थळांवर जमावबंदी

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गड-किल्ले, पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी प्रसृत केले. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, गड-किल्ले या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने घेऊन जाण्यास आणि पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

19:45 (IST) 13 Jul 2022
ओबीसी लोकसंख्या कमी झाल्याने त्यातून आरक्षण देण्याची मराठा समाजाची मागणी

माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अहवालानुसार आणि राज्य सरकारच्या सर्वेक्षणातून राज्यात ओबीसींची लोकसंख्या ३७ टक्के असल्याचे दिसून आल्याने ओबीसींच्या २७ टक्के कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे.

सविस्तर बातमी

19:43 (IST) 13 Jul 2022
“काँग्रेसने स्वाभिमान केव्हाच गहाण टाकलाय”, राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका

येत्या १८ जुलैला देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या भाजपाकडून द्रौपदी मूर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून मताची जुळवाजुळव सुरू आहे. सविस्तर वाचा

19:20 (IST) 13 Jul 2022
बीडच्या वडवणी तालुक्यातील पुसरा नदीला पूर; १० गावांचा संपर्क तुटला

बीडच्या वडवणी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे पुसरा नदी खळखळून वाहू लागलीय. या नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास १० गावांचा संपर्क तुटला आहे. पुसरा, तिगाव, चिंचाळा, माटेगाव यासह परिसरातील गावांचं दळणवळण ठप्प झाले आहे. आज आठवडी बाजार असल्याने नागरिकांना पुलावरून पाणी वाहत असल्याने बाजाराला जात आले नाही.

पावसापूर्वीच गावातील ग्रामस्थांनी या पुलाची दुरुस्ती अथवा नवीन पूल तयार करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलीय. पुलावरून पाणी वाहत असताना देखील काही वाहनधारक पुलावरून जाण्याचं धाडस करत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

18:53 (IST) 13 Jul 2022
उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर, बदलापुरकरांना सतर्कतेच्या सूचना

कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने नदीकिनारी भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. ३०० हून अधिक जणांना नदी पल्याडच्या बीएसयुपी गृहप्रकल्पात हलवण्यात आले होते. तर नदी किनारच्या शाळाही रिकाम्या करण्यात आले होते. येथे असलेल्या एका वृद्धाश्रमातून ज्येष्ठांना वरच्या मजल्यावर हलवण्यात आले होते. सायंकाळच्या सुमारास बदलापूर कर्जत राज्यमार्गावर पाणी साचण्यास सुरूवात झाली होती.

सविस्तर वाचा

18:34 (IST) 13 Jul 2022
प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा विनयभंग ; नामांकित रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा

नामांकित रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेचा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कर्मचाऱ्याच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पांडुरंग येडगे (वय ३७) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

18:31 (IST) 13 Jul 2022
“धनुष्यबाण शिंदे गटाला द्यावं आणि…” शिवसेनेच्या अंतर्गत वादात रामदास आठवले यांची उडी

शिवसेना पक्षातील अंतर्गत कलहामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. हे सत्तापालट झाल्यानंतर देखील शिवसेनेतील अंतर्गत कलह अद्याप कायम आहे. सविस्तर बातमी

18:18 (IST) 13 Jul 2022
मुंबईतील आशा सेविकांना कामानुसार दुप्पट मोबदला मिळणार – महापालिकेने घेतला निर्णय

मुंबईत प्राथमिक आरोग्य सेवा घरोघरी पोहचविणाऱ्या आशा सेविकांना मिळणारे मानधन कामानुसार दुप्पट करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. तसेच आरोग्य सेविकांना मानधनाव्यतिरिक्त कामानुसार मोबदला देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आशा सेविकांचे मासिक वेतन जवळपास दहा हजार रुपये तर आरोग्य सेविकांचे १५ हजार रुपये होईल. वाचा सविस्तर बातमी...

17:55 (IST) 13 Jul 2022
पुनर्विकास प्रकल्पात मोफत घरे द्या – बीडीडी चाळीत वास्तव्यास असलेल्या पोलिसांची सरकारकडे मागणी

सध्या बीडीडी चाळींतील सेवानिवासस्थानांमध्ये वास्तव्यास असलेल्या २२५० पोलिसांना बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात उभ्या राहणाऱ्या इमारतींमध्ये २५ लाखांत घर देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. मात्र युतीच्या काळात भाजपाने बीडीडीतील पोलिसांना मोफत घर देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची आठवण करून देत पोलिसांनी पुनर्विकासात मोफत घर देण्याची मागणी नव्या सरकारकडे केली आहे. या मागणीसाठी लवकरच पोलीस कुटुंबीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. वाचा सविस्तर बातमी...

17:39 (IST) 13 Jul 2022
उल्हासनगरातही शिवसेनेला भगदाड; २५ पैकी १५ माजी नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा

ठाणे, कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ पाठोपाठ आता उल्हासनगर शहरातही शिवसेनेच्या १५ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. आज (बुधवार) गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील आनंदाश्रम येथे या नगरसेवकांनी हजेरी लावली. उल्हासनगरात शिवसेनेचे २५ नगरसेवक होते, त्यापैकी १५ नगरसेवक गेल्याने शिवसेनेला भगदाड पडले आहे. वाचा सविस्तर बातमी...

17:33 (IST) 13 Jul 2022
राजू शेट्टी यांचा आंदोलनाचा इशारा...

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची केवळ घोषणा करू नये. ही रक्कम क्रांती दिना पूर्वी शेतकऱ्यांना मिळाली नाही तर पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी दिला.

सविस्तर वाचा

17:33 (IST) 13 Jul 2022
सनथ जयसूर्या पंतप्रधानांवर संतापला; म्हणाला “विचार करा मिस्टर बीन…”

श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटात सापडलेली असताना अध्यक्ष गोताबाया राजपक्षे देश सोडून पळून गेले आहेत. यानंतर पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. नियुक्ती होताच रनिल विक्रमसिंघे यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. दरम्यान पश्चिम प्रांतात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असल्याने श्रीलंकेचा माजी क्रिकेटर सनथ जयसूर्याने संताप व्यक्त केला आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्यावर टीका केली आहे.

सविस्तर बातमी

17:23 (IST) 13 Jul 2022
आर्यन खानला त्याचे पारपत्र परत द्या – विशेष न्यायालयाचे ‘एनसीबी’ला आदेश

क्रुझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी जामिनाच्या अटीचा भाग म्हणून जमा करण्यात आलेले अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनचे पारपत्र त्याला परत करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने आज (बुधवार) विशेष न्यायालयाला दिले. वाचा सविस्तर बातमी...

17:07 (IST) 13 Jul 2022
अडीच वर्षांपूर्वीच निर्णय घेतले असते तर, आता ही वेळ आली नसती – मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला!

भाजपा प्रणित लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना उद्धव ठाकरे यांनी आता पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असला, तरी याबाबतचा निर्णय आम्ही यापूर्वीच घेतलेला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच, “अशा प्रकारचे निर्णय त्यांनी अडीच वर्षांपूर्वी घेतले असते तर, आता ही वेळ आली नसती. ”, असा टोलाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी लगावला. वाचा सविस्तर बातमी...

16:28 (IST) 13 Jul 2022
पिंपरी-चिंचवडमध्ये पवना नदीच रौद्र रूप; मुसळधार पाऊस सुरू

पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहरात आज(बुधवार) सकाळ पासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातून वाहणारी पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच रौद्र आणि तितकंच सुंदर असं रूप पिंपरी-चिंचवडकरांना पाहण्यास मिळत आहे. वाचा सविस्तर बातमी...

16:14 (IST) 13 Jul 2022
चिपळूण : जगबुडी नदीने गाठली धोक्याची पातळी; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

खेड तालुक्यात रात्रभर पावसाचा जोर कायम असल्याने जगबुडी नदी धोकादायक पातळीवरून वाहत असल्याने खळबळ उडाली आहे. खेड शहरात अद्याप पाणी आलेले नाही. मात्र जगबुडी नदी काठच्या सुमारे पंचवीस ते तीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी...

16:05 (IST) 13 Jul 2022
…अन् अखेर त्याचा मृतदेहच आढळला; वर्धा जिल्ह्यातील पूरबळींची संख्या सातवर

वर्धा मधील सेलू तालुक्यातील सालई शिवारात रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या संतोष उत्तम आडे या युवकाचा आज (बुधवार)सकाळी दहा वाजता अखेर मृतदेह आढळून आला. यामुळे जिल्ह्यात पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या आता सातवर पोहचली आहे. वाचा सविस्तर बातमी...

15:52 (IST) 13 Jul 2022
धक्कादायक! समुद्राच्या लाटेत वाहून गेलेले तीन जण सांगलीकर

गेले दोन दिवस एक व्हिडीओ वायरल होत आहे. समुद्राची लाट ही खडकांवर आदळते,लाटेचे पाणी परत समुद्रात वाहून जात असतांना या पाण्यात तीन जणं वाहून जातात असं या व्हिडीओत दिसते. वाहून गेलेल्या लोकांचे पुढे काय झाले, ते वाचले का अशा प्रतिक्रियाही या व्हिडीओच्या निमित्ताने व्यक्त झाल्या. तर हा वायरल व्हिडीओ ओमान देशातील असून या घटनेचा संबंध हा सांगलीशी आहे.

सविस्तर वाचा

15:51 (IST) 13 Jul 2022
ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस ;  दोन आठवड्यात तब्बल ६८५.३ मिमी पावसाची नोंद

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील जवळपास सगळ्याच तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद करण्यात आली होती. याच पद्धतीने मागील सात दिवसाच्या कालावधीतही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात ही सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी…

15:50 (IST) 13 Jul 2022
उल्हास नदीची पाणीपातळी वाढल्यास अंबरनाथ, बदलापूरचा पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता!

ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या संतधर पावसामुळे दोनही जिल्ह्यांमधून वाहणारी उल्हास नदी दुथडी भरून वाहते आहे. बदलापुरात उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. याच नदीकिनारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. पाण्याची पातळी वाढल्यास हे केंद्र बंद करण्याची वेळ येते. आता इशारा पातळीपासून धोका पातळी अवघे काही सेंटीमीटर असल्याने पाणी पातळी अशीच वाढल्यास हे केंद्र बंद पडण्याची भीती आहे. त्यामुळे संपूर्ण बदलापूर शहर आणि अंबरनाथ शहराच्या काही भागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर बातमी...

15:35 (IST) 13 Jul 2022
पुरात अडकली बस; पोलीस, ग्रामस्थांनी वाचविले ३५ प्रवाशांचे प्राण

सलग चार दिवसांपासून  चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पूर आला असून कित्येक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच, राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुरात एक खासगी प्रवासी बस अडकल्याने तब्बल ३५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. वाचा सविस्तर बातमी…

15:05 (IST) 13 Jul 2022
विश्लेषण: ‘सिंहमुद्रे’वरून टीकेचे राजकारण का रंगले आहे?

नवीन संसदभवनाच्या दर्शनी भागावर, भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह असलेल्या अशोक स्तंभातील सिंहमुद्रेची प्रतिकृती बसवण्यात आली असून तिचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. परंतु ही प्रतिकृती सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रतीकाच्या अनावरणप्रसंगी विरोधी पक्षियांना बोलावले गेले नाही, हा एक आक्षेप. दुसरा अधिक गंभीर आक्षेप प्रत्यक्ष सिंहमुद्रेच्या स्वरूपाविषयी आहे. या मुद्रेतील सिंह मूळ सिंहांच्या तुलनेत निष्कारण दात विचकणारे, बटबटीत, आक्रमक असल्याची टीका अनेकांकडून होत आहे. या सर्व घडामोडींवरील हा विश्लेषणात्मक दृष्टिक्षेप

सविस्तर बातमी

15:04 (IST) 13 Jul 2022
डीजेवर पूर्ण बंदी कशासाठी ? ; एमपीसीबीच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह ; भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने डीजे व कर्णकर्कश वाद्यांवर पूर्ण बंदी का घातली ? अशी विचारणा करून न्यायालयाने त्यावर प्रश्न उपस्थित केले. तसेच त्याबाबत २ ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले. वाचा सविस्तर बातमी…

15:01 (IST) 13 Jul 2022
पुण्यात नांदेड-शिवणे पुलावरुन तरुण वाहून गेला

खडकवासला धरणात मुसळधार पाऊस सुरू असून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. दरम्यान, नांदेड-शिवणे पुलावरुन दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली. त्यापैकी एक तरुण बचावला असून पाण्यात वाहून गेलेल्या दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. वाचा सविस्तर बातमी...

14:51 (IST) 13 Jul 2022
No Entry : लोणावळ्यात पर्यटनस्थळी पाच नंतर पर्यटकांना प्रवेश बंदी

वर्षाविहाराच्या निमित्ताने हजारो पर्यटक भुशी धरण, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट इथे दाखल होतात. नुकतंच मुंबईतील एका पर्यटकाचा भुशी धरणात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळं पोलिसांनी अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा

14:43 (IST) 13 Jul 2022
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या डोंबिवलीतील तरुणाला २० वर्षांचा तुरुंगवास

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका तरुणाला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. आस्टूरकर यांनी २० वर्षे कारावासाची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम भरणा न केल्यास आणखी एक वर्ष कारावासाची शिक्षा भोगण्याचे आदेश दिले. गेल्या सात वर्षापूर्वी हा प्रकार डोंबिवलीत घड़ला होता. या प्रकरणात अटक झाल्यापासून आरोपी आधारवाडी तुरुंगात होता. वाचा सविस्तर बातमी...

14:35 (IST) 13 Jul 2022
पुणे शहरातील शाळा पुढील दोन दिवस बंद

पुणे शहर आणि आसपासच्या भागात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील शाळा गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे.

14:30 (IST) 13 Jul 2022
डोंबिवली पूर्व, ठाकुर्ली रेल्वे स्थानकांमधील सरकते जिने बंद

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील सरकता जीना, उद्वाहन गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. जीना, उद्वाहन बंद असल्याने प्रवाशांना स्कायवाॅकच्या पायऱ्या चढून फलाटावर जावे लागते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांचे सर्वाधिक हाल होतात. वाचा सविस्तर बातमी...

14:29 (IST) 13 Jul 2022
आदित्य ठाकरेंवरील टीकेमुळे किशोरी पेडणेकर संतापल्या

गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसैनिक आज शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील अभिवादन कऱण्यासाठी पोहोचल्या होत्या. दरम्यान यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेवर आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवणार असा निर्धार व्यक्त केला. तसंच आदित्य ठाकरेंवर टीका करणारे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर टीकास्त्र सोडंल.

सविस्तर बातमी

Maharashtra Breaking News Today

महाराष्ट्र लाइव्ह अपडेट्स १३ जुलै २०२२