Maharashtra- Mumbai Heavy Rain Alert : हवामान विभागाने आज मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईत सकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल साधारण १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर बघता जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण आणि मदत कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात सर्वत्र पावसाने चागंली हजेरी लावली आहे.

दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट केलं असून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरु असल्याचं सांगत आहेत याचं आश्चर्य वाटतं, जर बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं असं सांगत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. या सर्व घडामोडींचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra Breaking News Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

14:29 (IST) 13 Jul 2022
चंद्रपुरातील इरई धरणाचे सात दरवाजे उघडले; घरांमध्ये पाणी शिरले

चंद्रपुरमधील इरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आल्याने नदी काठावरील रहमत नगर येथे पुराचे पाणी अनेक घरात शिरले आहे. खबरदारी म्हणून २५ घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले शाळा घुटकाळा व सरदार पटेल कन्या शाळा येथे या नागरिकांना आणण्यात आले आहे. तर, इतरांना आणण्याची मोहीम सुरु आहे. वाचा सविस्तर बातमी…

14:20 (IST) 13 Jul 2022
“…म्हणून मी राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो”, गुरूपोर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना

शिवसेनेच्या परंपरेत गुरूपोर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना, गुरूपोर्णिमेच्या दिवशी हजारो शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करत असायचे. आज त्यांच्या मृत्यूनंतर देखील हजारो शिवसैनिक दरवर्षी त्यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन वंदन केलं आहे. आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. यानंतर आता ते आनंद दीघे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन वंदन करणार आहेत. सविस्तर बातमी

14:08 (IST) 13 Jul 2022
डोंबिवली पूर्व, ठाकुर्ली रेल्वे स्थानकांमधील सरकते जिने बंद

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील सरकता जीना, उद्वाहन गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. जीना, उद्वाहन बंद असल्याने प्रवाशांना स्कायवाॅकच्या पायऱ्या चढून फलाटावर जावे लागते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांचे सर्वाधिक हाल होतात. वाचा सविस्त बातमी…

14:05 (IST) 13 Jul 2022
शैक्षणिक कर्ज मिळविणाऱ्या विद्यार्थिनीची बदनामी ; सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा 

महाविद्यालयीन शिक्षणासाठी ऑनलाइन कर्ज घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थिनीची सायबर चोरट्यांनी बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका विद्यार्थिनीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे वाचा सविस्तर बातमी…

13:59 (IST) 13 Jul 2022
गुरुपौर्णिमा म्हणजे निष्ठा आणि विश्वास – खासदार राजन विचारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा!

“गुरुपौर्णिमा म्हणजे निष्ठा आणि विश्वास” अशी प्रतिक्रिया देत शिवसेना खासदार राजन विचारे यानी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे माझे गुरु असल्याचे सांगत या दोघांनीही तळागाळापर्यंत शिवसेना नेऊन शेवटपर्यंत संघटनेसाठी काम केल्याचे त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर बातमी…

13:51 (IST) 13 Jul 2022
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून सुट्टी जाहीर

पुणे जिल्ह्यात कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि पुढील दोन दिवसात दिलेला अतिवृष्टीचा इशारा हे पाहून पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने आज आणि उद्या (१४ जून) रोजी सुट्टी जाहीर केली. पुढील दोन दिवस हवामान खात्याने अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळं महानगर पालिका तसेच खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे पत्रकच प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील काढले आहे.

13:41 (IST) 13 Jul 2022
बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मी मुख्यमंत्री- एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरूपोर्णिमेच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट वंदन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच मी आज मुख्यमंत्री होऊ शकलो आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यांच्याच आशीर्वादाने त्यांचे विचार आम्ही महाराष्ट्रात पुढे घेऊन जात आहोत. आमचं युती सरकार सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करेल, असंही ते म्हणाले.

13:29 (IST) 13 Jul 2022
विरूद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या एक लाख मुंबईकरांवर कारवाईचा बडगा ; ठाणे, नवी मुंबईतही नियम धाब्यावर

राज्यात विशेषत: मुंबईत वाहनचालक  वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवित आहेत. बहुसंख्य वाहनचालक एकदिशा मार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालवून नियम पायदळी तुडवताना दिसतात. या बेशिस्त मंडळींमुळे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यानाही धोका निर्माण होत आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:27 (IST) 13 Jul 2022
शिंदेविरोधी गटाला कोंडीत पडकण्याची खेळी ? उल्हासनगर शहरप्रमुखांवर गुन्हा, अंबरनाथ प्रमुखांचे संरक्षण काढले

सोमवारी अंबरनाथचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांची पोलीस सुरक्षा तांत्रिक कारणावरून काढण्यात आली. तर मंगळवारी उल्हासनगरचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यावर जून महिन्यातल्या एका प्रकारावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या शिवसैनिकांना कोंडीत पकडण्याची खेळी खेळली जात असल्याचे बोलले जाते आहे.

सविस्तर वाचा

13:12 (IST) 13 Jul 2022
…म्हणून ऐन पावसाळ्यात ठाणेकरांवर पाणी संकट

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात पावसाचा जोर वाढला असतानाच, दुसरीकडे ऐन पावसाळ्यात ठाणेकरांवर पाणी संकट ओढवले आहे. भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पाणी उपसा करणाऱ्या पंपाच्या मुखाशी गाळ आणि कचरा अडकल्याने पुरेशा पाण्याचा उपसा होत नसून, यामुळे पुढील तीन ते चार दिवस शहरात कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:11 (IST) 13 Jul 2022
उल्हास नदी इशारा पातळीवर, बदलापूर पालिकेकडून सतर्कतेसाठी सूचना

उल्हास नदी ही आता इशारा पातळीवर असून बुधवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास उल्हास नदीची पाणी पातळी १६.५० मीटर इतकी झाली होती. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने शहरातील सखल भागांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना देण्यास सुरूवात करण्यात आली. बदलापुरात उल्हास नदीची इशारा पातळी १६.५० तर धोका पातळी १७.५० इतकी आहे.

सविस्तर वाचा

12:41 (IST) 13 Jul 2022
‘तानसा’ आणि ‘मोडक सागर’ धरणाच्या पाणी पातळीत वाढ

शहापूर तालुक्यात असलेले आणि मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा आणि मोडक सागर धरणांच्या पाणी पातळीत मागील चोवीस तासाच्या कालावधीत कमालीची वाढ झाली असून दोन्ही धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने धरण परिसरातील १८ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:41 (IST) 13 Jul 2022
विदर्भात पावसाचा रुद्रावतार; गडचिरोलीत पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी

नागपूर शहरासह विदर्भातील काही जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील गोरेवाडा धरण भरले असून चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीला आलेल्या पुरामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने आलपल्ली- भामरागड हा मार्ग बंद करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:09 (IST) 13 Jul 2022
नागपुरात पावसाचे थैमान; गोरेवाडा, अंबाझरी ‘ओव्हरफ्लो’, वाठोड्यातील झोपड्यांमध्ये पाणी

नागपूर ग्रामीणमध्ये पावसाचा जोर कायम असताना मंगळवारी रात्रीपासून शहरात देखील मुसळधार पावसाचा वेग वाढला. या पावसामुळे गोरेवाडा धरण पूर्णपणे भरले असून धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत. शहरातील अंबाझरी तलाव देखील ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. वाचा सविस्तर बातम्या…

12:00 (IST) 13 Jul 2022
विश्लेषण : धरणातून विसर्ग म्हणजे काय?

राज्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. विसर्ग म्हणजे काय, तो का करावा लागतो, विसर्ग करण्याचा निर्णय कोण घेतो, विसर्ग करताना काय दक्षता घ्यावी लागते ?

सविस्तर वाचा

11:59 (IST) 13 Jul 2022
एकनाथ शिंदेंचं गुरूपौर्णिमेला बाळासाहेबांना विनम्र अभिवादन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ट्वीट केलं असून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपण त्यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्याचं सांगितलं आहे. तसंच बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच असं सांगत अप्रत्यक्षपणे आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे.

सविस्तर बातमी

11:58 (IST) 13 Jul 2022
मुंबई : संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल विलंबाने

मुंबईत सकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल साधारण १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. कोसळणारा संततधार पाऊस आणि विलंबाने धावणाऱ्या लोकलमुळे मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली असून अनेकांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला.

सविस्तर वाचा

11:58 (IST) 13 Jul 2022
संजय राऊतांची बंडखोर आमदारांवर टीका; म्हणाले “आज बाळासाहेब असते तर…”

बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरु असल्याचं सांगत आहेत याचं आश्चर्य वाटतं. जर बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं असं सांगत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

सविस्तर बातमी

11:57 (IST) 13 Jul 2022
शरद पवारांनीच नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मदत केली; केसरकरांचा मोठा दावा

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती असा दावाही दीपक केसरकर यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते असंही त्यांनी सांगितलं.

सविस्तर बातमी

11:57 (IST) 13 Jul 2022
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम वेगाने, एक हजार पाईलिंगचे काम यशस्वी

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रोच्या अनुषंगाने विविध कामे वेगाने सुरू आहेत. मंगळवारी (१२ जुलै) मेट्रो मार्गावरील एक हजार पाईलिंगचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. बालेवाडी क्रीडा संकुलाजवळ मेट्रोचे नियोजित स्थानक क्रमांक दहा येथे एक हजाराव्या पाईलिंगचे काम मंगळवारी पूर्ण करण्यात आले.

सविस्तर वाचा

11:49 (IST) 13 Jul 2022
ठाणे स्थानकात ‘लोकल’मध्ये तांत्रिक बिघाड; वेळापत्रकावर परिणाम

ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आज (बुधवार) सकाळी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्यातच ठाणे स्थानकात लोकलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, तांत्रिक बिघाड झालेली लोकल काही मिनिटांमध्ये सुरू झाली. मात्र प्रवाशांना स्थानकावर उतरवून लोकल कारशेडमध्ये पाठविण्यात आली. वाचा सविस्तर बातमी…

11:40 (IST) 13 Jul 2022
‘खडकवासला’तून सहा वर्षात प्रथमच लवकर विसर्ग

पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील खडकवासला हे धरण १०० टक्के भरल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून गेल्या सहा वर्षांत खडकवासला धरण हे ११ जुलै रोजीच पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

11:39 (IST) 13 Jul 2022
मुंबई : सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई शहर आणि उपनगरांत मंगळवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा मुक्काम बुधवारीही कायम आहे. बुधवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे सखलभागात जलमय झाले. मुंबई शहर आणि उपनगरांत बुधवारी दिवसभर मध्यम आणि मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून प्रतितास ४५-५५ किमी वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता कुलाबा केंद्रातून वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:27 (IST) 13 Jul 2022
Good News : बारवी धरण निम्मे भरले; ठाणे जिल्ह्यावरील पाणी संकट तूर्तास टळले

गेल्या काही दिवसांपासून बारवी धरण क्षेत्रात पडणाऱ्या समाधानकारक पावसामुळे बारवी धरण आपल्या क्षमतेच्या ५० टक्के भरले आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला हा पाणीसाठा अवघा ३० टक्क्यांवर आला होता. मात्र गेल्या पंधरा दिवसात चांगला पाऊस पडल्याने वेगाने धरणाची पाणी पातळी वाढली आहे. असाच पाऊस कायम राहिल्यास जुलै अखेरीस बारावी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा आहे.

सविस्तर वाचा

11:25 (IST) 13 Jul 2022
गुरुपौर्णिमा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभीनाका येथील आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुरुपौर्णिमे निमित्त दुपारी साडेबारा वाजता आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळावर शक्तिस्थळ येथे जाऊन नतमस्तक होणार आहेत. तर, दुपारनंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे देखील शक्तीस्थळावर जाणार आहेत. त्यामुळे आज शिवसैनिक आणि शिंदे गटाचे या ठिकाणी एकप्रकारे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

महाराष्ट्र लाइव्ह अपडेट्स १३ जुलै २०२२