Maharashtra Political Crisis Updates, 03 October 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची देण्यात आल्याचे काल समोर आल्यानंतर खळबळ उडाल होती. मात्र मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली होती मात्र तो वेडसर असल्याचे समोर आल्यानंतर त्याची चौकशीनंतर सुटका केली आहे. तर यंदा झेंडूची लागवड मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली असली तरी पावसाच्या संततधारेमुळे त्याचे नुकसान झाल्याने पुरवठय़ावर परिणाम होऊन दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे भाव वधारण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
याशिवाय शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरूनही राजकीय वर्तुळात रोज नेतेमंडळींची नवनवीन विधानं समोर येत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याशिवाय राज्यभरातील अन्य राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व सर्वच क्षेत्रांमधील घडामोडी वाचा फक्त एकाच क्लिकवर.
Maharashtra Latest News Updates in Marathi: राज्यभरातील अन्य राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व सर्वच क्षेत्रांमधील घडामोडी वाचा फक्त एकाच क्लिकवर.
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका शहराला अव्वल स्थानी येण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात नवी मुंबई शहर देशात तिसऱ्या स्थानावर आहे. बातमी वाचा सविस्तर …
पुणे : दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे. तो वेगळा पक्ष आहे. या दसरा मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार नाही. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा हा त्या पक्षाचा कार्यक्रम आहे. त्यांचे नेते त्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पडणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. बातमी वाचा सविस्तर …
शिवसेनेतील बंडाखोरी नंतर यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून संघर्ष निर्माण झाला होता. हे प्रकरण न्यायालयातही गेलं होतं. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कात होत आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत आहे. यासाठी दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन सुरू आहे. तसेच दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि टोलेबाजी सुरू आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दोन दसरा मेळावा होत असल्याने मला दुख होत आहे, असे वक्तव्य केले होते. त्याला आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्त्युतर दिले आहे. सविस्तर वाचा –
उरण : जेएनपीटीला जोडणाऱ्या न्हावा शेवा उड्डाणपूलाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या पुलावरील खड्ड्यांतील खडीमुळे मातीचा धुरळा झाला आहे. बातमी वाचा सविस्तर …
विरार : विरार मध्ये दांडिया खेळताना एका पस्तीस वर्षे तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि पिता पुत्रांचे रुग्णालयात नेण्यापूर्वीच निधन झाले . बातमी वाचा सविस्तर …
औरंगाबादमध्ये एका भूमिपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात जुगलबंदी झाल्याचं पहायला मिळालं. रावसाहेब दानवे यांनी निजाममुळेच मराठवाड्यात रेल्वेचं नेटवर्क नाही असं सांगत जलील यांच्या मागणीवर उतर दिलं. तसंच औरंगाबाद नव्हे तर संभाजीनगरसाठी मागण्या करा, असा टोलाही लगावला. त्यांच्या या विधानावर जलील यांनीही उत्तर देत देण्यासाठी काहाही ठोस नसल्याने निजाम आठवत आहे असं म्हटलं.
भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासह सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. शिवाय, आपण, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठ नेते, ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वानी माझी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया देत खुलासा केला आहे. वाचा सविस्तर बातमी…
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला आहे. एकूण १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. तर महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथे यात्रेचे आगामन होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या मोठय़ा सभा घेण्याचे प्रदेश काँग्रेसचे नियोजन आहे. वाचा सविस्तर बातमी…
रविवारी साताऱ्यात झालेल्या एका सभेत बोलताना अजित पवार यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. “अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडू नये. आम्ही कधी सत्तेत येऊ तुम्हाला कळणारही नाही” असे वक्तव्य त्यांनी केले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे. सविस्तर वाचा –
पनवेल : रस्त्याकडेला आडोसा पाहून लघुशंकेसाठी वाहन थांबविणार असाल तर जरा सावधानता बाळगा, असे बोलण्याची वेळ आली आहे. खाऱघर वसाहतीमधील सेक्टर ३९ येथील परिसरात पापाडीचा पाडानजीक बौद्ध स्मशानभूमीजवळील मार्गावर दुपारी दिड वाजण्याच्या सूमारास शनिवारी ही घटना घडली आहे. बातमी वाचा सविस्तर …
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ‘खरी शिवसेना कोणती’ यावरुन वाद सुरु असून, ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाला मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. पक्षचिन्हावरुन सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने असतानाच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
पनवेल : तालुक्यातील केळवणे गावात रविवारी सकाळी ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशनच्या हिशोबावरुन झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसन भांडणात झाले. विलास ठाकूर हे गेली चार वर्षे गावातील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष होते. बातमी वाचा सविस्तर …
नाशिक : धक्का लागल्याची कुरापत काढून एकाने दांडीया पाहणाऱ्या युवकासह त्याच्या होणाऱ्या सासूवर कोयत्याने हल्ला चढवत त्यांना जखमी केले. गंगापूर रस्त्यावरील आनंदवल्ली भागात ही घटना घडली. बातमी वाचा सविस्तर …
ठाणे : ठाणे आणि भिवंडी शहरांच्या वेशीवर असलेल्या कशेळी-काल्हेर भागात सोमवारी म्हजणेच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. गेल्या तीन तासांपासून बत्तीगुल झाल्याने नागरिक हैराण झाले असून इमारतींच्या विद्युत मोटार बंद असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाई समस्येचाही सामना करावा लागला. बातमी वाचा सविस्तर …
पिंपरी : शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्याच आवारात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करणे योग्य नाही. जागा उपलब्ध असलेल्या सोसायट्यांमध्ये महापालिकेने स्वतःचा निधी देऊन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावी. त्याचप्रमाणे, गृहनिर्माण संस्थांचा कचरा न उचलण्याच्या निर्णयाला बेमुदत स्थगिती द्यावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे. बातमी वाचा सविस्तर …
पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणावर तिघांनी शस्त्राने वार केल्याची घटना धनकवडीतील चव्हाणनगर परिसरात घडली. तरुणावर हल्ला करुन तिघे जण पसार झाले असून हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही. बातमी वाचा सविस्तर …
गोव्यातून महाराष्ट्रात मद्य आणणाऱ्यांवर यापुढे मकोकाअंतर्गत (MCOCA) कडक कारवाई केली जाणार आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शभूराज देसाई यांनी यासंबंधी कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडियाच्या’ वृत्तानुसार, शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना तस्करी करणाऱ्यांविरोधात एक प्रस्ताव तयार करत पोलीस प्रशासनाला पाठवण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन पोलिसांना मकोकाअंतर्गत कारवाई करता येईल.
नाशिक : सिडको येथील महाकाली चौक परिसरातील सार्वजनिक नवरात्र उत्सवात दांडिया खेळण्यासाठी गेलेल्या एका युवकाला मागील भांडणाची कुरापत काढत काही युवकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. बातमी वाचा सविस्तर …
काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात थेट लढत होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना मिळणारा पाठिंबा पाहता तेच नवे अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित आहे. यादरम्यान, शशी थरुर यांनी एक मोठं विधान केलं असून खरगे पक्षात कोणताही बदल घडवणार नाहीत असं म्हटलं आहे. खरगे आहे तीच व्यवस्था पुढे कायम ठेवतील असंही त्यांनी सांगितलं.
कोम्बॅक्ट आर्मी एव्हिशन स्कूल पाठोपाठ संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळा परिसरात ड्रोनची घुसखोरी झाल्याच्या घटनेची दखल घेत पोलिसांनी शहरातील सर्व ड्रोन मालक, चालकांना आपले ड्रोन तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या काढलेल्या आदेशाला नाशिक छायाचित्रकार संघटनेने विरोध केला आहे. बातमी वाचा सविस्तर …
नवी मुंबई : संत गाडगेबाबा अभियानात पहिले तीन वर्ष सलग महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर व देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबई शहराला व महापालिकेला स्वच्छतेते नावलौकीक मिळवून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राज्यात नेहमीच प्रथम तर देशात सतत मानांकन उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकीक प्राप्त झाला आहे. बातमी वाचा सविस्तर …
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘स्वबळ’ दाखवता यावे, यासाठी भाजप नेते त्यांच्या वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या दसरा मेळाव्यापासून दूर राहणार आहेत. वाचा सविस्तर बातमी..
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक करुन त्याची चौकशीनंतर सुटका केली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री शिंदेंच्या हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती दिल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील नाशिक फाटा येथून लोणावळा पोलिसांनी ३६ वर्षीय अविनाश अप्पा वाघमारेला त्याबात घेतलं. मूळचा घटकोपर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील साठे चाळीतील रहिवाशी असलेल्या वाघमारेने पोलिसांना असा फोन का केला होता यासंदर्भातील विचित्र माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर बातमी…
यंदा झेंडूची लागवड मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली असली तरी पावसाच्या संततधारेमुळे त्याचे नुकसान झाल्याने पुरवठय़ावर परिणाम होऊन दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे भाव वधारण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर बातमी…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक करुन त्याची चौकशीनंतर सुटका केली आहे.