Marathi Batmya, 29 November 2022 : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन पुन्हा वाद सुरू झाला आहे. गोव्यात सुरू असलेल्या इंटरनॅशन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मध्ये ज्युरींनी या चित्रपटावर टीका केली आहे. ज्युरी हेड व इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांनी हा चित्रपट ‘व्हल्गर’ व ‘प्रोपगंडा’ असल्याचं म्हटलं. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा चिघळू लागला असून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही चालू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील गावांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे हे वातावरण तापलं असताना कर्नाटकने जतमधील ४० गावांवर दावा करण्याची तयारी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे यावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra Live News, 29 November 2022 : गोखले पूल हलक्या वाहनांसाठी सुरू होण्याची शक्यता धूसर

17:55 (IST) 29 Nov 2022
“… म्हणून उद्धव ठाकरेंनी हिंदू शब्द उच्चारूदेखील नये”; नारायण राणेंची टीका

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकारपरिषद घेत राज्यात विविध मुद्य्यांवरून मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आणि भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. वाचा सविस्तर बातमी...

17:34 (IST) 29 Nov 2022
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकारपरिषद घेत राज्यात विविध मुद्य्यांवरून मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आणि भूमिका मांडली. यावेळी सर्वप्रथम राणेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा उल्लेख करत त्यावर प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर बातमी...

17:07 (IST) 29 Nov 2022
मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर अदानी समुहाकडे; अदानीची सर्वाधिक पाच हजार कोटी रुपयांची बोली

आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानी समुहाकडून करण्यात येणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) मंगळवारी बांधकाम निविदा छाननी पूर्ण करून उघडल्या असून यात अदानी समुहाने बाजी मारली. अदानी समुहाने पाच हजार कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे.

सविस्तर वाचा

17:03 (IST) 29 Nov 2022
भंडारा: शाळेतून घरी आल्यावर चिमुकली खेळण्याकरिता बाहेर गेली आणि...

खेळण्यासाठी घराबाहेर गेलेली आठ वर्षीय चिमुकली २४ तास लोटूनही परत आली नसल्याची खळबळजनक घटना पापडाखुर्द येथे आज उघडकीस आली. हिंस्त्र पशूचा हल्ला, अपघात किंवा घातपात, अशा विविध चर्चांना उधाण आले असून आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी तसेच इतर पोलीस अधिकारी या गावात दाखल झाले आणि ताबडतोब शोध मोहीम सुरू केली आहे.

सविस्तर वाचा

16:02 (IST) 29 Nov 2022
कल्याण-डोंबिवलीकरांना ‘पालिका’च पाजते फुकट पाणी

कल्याण डोंबिवली पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. कर वसुलीतील एक रुपयाही महत्वाचा असताना गेल्या वर्षभरापासून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना प्रशासनाने संगणकीकरणातील गोंधळामुळे पाणी वापराची देयकेच पाठविली नसल्याची बाब समोर आली आहे.

सविस्तर वाचा

15:29 (IST) 29 Nov 2022
छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुटने २५ कोटी रुपयांची इमारत अशी बळकावली…

दक्षिण मुंबईमधील उमरखाडी येथील २५ कोटी रुपये किंमतीची इमारत बळकवल्याच्या आरोपाखाली यूएईमधून हद्दपार करण्यात आलेला छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुटला खंडणीविरोधी पथकाने सोमवारी अटक केली. संबंधित इमारत मालकाचा २००६ मध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर या इमारतीची मालकी २०१९ मध्ये त्याच्या पत्नीला मिळाली.

सविस्तर वाचा

15:27 (IST) 29 Nov 2022
नागपूरात पुढील तीन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

नागपूर: नागपूर महापलिका व ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनीने जलकुंभ स्वच्छता मोहीम-२०२२ सुरु केली आहे. या अंतर्गत लक्ष्मी नगर झोन मधील त्रिमूर्ती नगर जलकुंभ ३० नोव्हेंबर (बुधवार) आणि प्रताप नगर जलकुंभ २ डिसेंबर (शुक्रवार ) रोजी स्वच्छ करण्यात येणार आहे. सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात पाणीपुरवठा बाधित राहील. जलकुंभ स्वच्छता दरम्यान टँकर्सद्वारे पाणीपुरवठा होणार नाही. बातमी वाचा सविस्तर...

15:10 (IST) 29 Nov 2022
महत्त्वाची बातमी : पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी बातमी दिली आहे. अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर बातमी...

14:45 (IST) 29 Nov 2022
डोंबिवली-कल्याणमधील १५०० वाहन चालकांवर वाहतूक विभागाची कारवाई

कल्याण-डोंबिवली, कोळसेवाडी वाहतूक विभागाने रविवारी दिवसभर विशेष तपासणी मोहीम राबवून एक हजार ५०० वाहन चालकांवर कारवाई केली. या वाहन चालकांकडून वाहतूक विभागाने एक दिवसात सुमारे आठ लाख रुपयांचा दंड वसूल केला. सर्वाधिक वाहन चालक हे दर्शक यंत्रणा (वाहतूक सिग्नल) न जुमानता वाहन चालवित असल्याचे आढळून आले आहेत, अशी माहिती कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

सविस्तर वाचा

14:08 (IST) 29 Nov 2022
ठाणे: दुचाकींची एकमेकांना धडक, भीषण अपघातात वडिलांचा मृत्यू; मुलगा जखमी

ठाणे येथील मनोरुग्णालयाजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत एका ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. राजेश वाल्मिकी (४१) असे मृताचे नाव असून याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी वाचा सविस्तर...

14:02 (IST) 29 Nov 2022
“बेळगावात बोलावून माझ्यावर हल्ल्याचा कट”; राऊतांच्या दाव्यावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया; म्हणाले, “ते स्वत:ला…”

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला असताना मला बेळगावात बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातो आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राऊतांच्या या दाव्यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे विनाकारण स्वत:ला मोठ असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात, असे ते म्हणाले. तसेच सीमवादावर लवकरच दिल्लीत जाऊन आपल्या वरिष्ठ वकिलांशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सविस्तर वाचा

13:50 (IST) 29 Nov 2022
मुंबई: रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ; मध्य-पश्चिम मुंबई उपनगरीय हद्दीत सर्वाधिक घटना

रुळालगतच्या झोपडपट्ट्यांमधून मध्य आणि पश्चिम उपनगरीय लोकल, मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर दगडफेकीच्या घटना सातत्याने घडत असून या घटनांमध्ये प्रवासी जखमी होत आहेत. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून आतापर्यंत झोपडपट्ट्यांमधून लोकलवर दगडफेकीच्या २४ घटना घडल्या असून आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

13:19 (IST) 29 Nov 2022
डोंबिवलीत पलावामध्ये घर मालकाकडून भाडेकरूला धमकी; घरातील सामान फेकले

डोंबिवलीत पलावा नागरी वसाहतीमधील पोशिओ लेकशोअर येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाचे घरातील सामान या घराच्या मालकाने रागाच्या भरात घराबाहेर फेकून दिले. ज्येष्ठ नागरिकाला मारण्याची धमकी दिली. सामान फेकण्याच्या झटापटीत ज्येष्ठ नागरिकाच्या हाताचे बोट मोडले आहे.

सविस्तर वाचा

13:04 (IST) 29 Nov 2022
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना भुजबळांनी करुन दिली बाळासाहेबांची आठवण; म्हणाले, “ते शेवटपर्यंत…”

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील गावांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. तसेच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. दरम्यान, यामुद्यावरून बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानावरून चांगलाच समाचार घेतला. तसेच बाळासाहेब हे संयुक्त महाराष्ट्रासाठी शेवटपर्यंत लढले, असेही ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

12:55 (IST) 29 Nov 2022
Shraddha Murder Case: आफताब पूनावालावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय

श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याला घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनावर सोमवारी सशस्त्र हल्ला करण्यात आला. यानंतर आज सकाळी ८.३० वाजता आफताबला पॉलिग्राफी टेस्टच्या दुसऱ्या फेरीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये नेलं जात असताना कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. आफताबला नेणाऱ्या पोलीस वाहनावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

सविस्तर बातमी

12:55 (IST) 29 Nov 2022
Delhi Murder: रोज सापडत होते मृतदेहाचे तुकडे, पोलिसांनी तपासले तब्बल ५०० फ्रीज; असा झाला दिल्लीच्या पांडव नगरमधील खूनाचा उलगडा

दिल्लीमध्ये अगदी श्रद्धा वालकर हत्याकांडाशी साम्य असणारी घटना घडली आहे. महिलेने आपल्या सावत्र मुलाच्या मदतीने पतीचा खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर त्यांनी मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावली होती. पोलिसांना रामलीला मैदानातून वारंवार मृतदेहाचे तुकडे सापडत होते. पण हे तुकडे कुठून येत आहेत याबाबत त्यांना काहीच सुगावा लागत नव्हता. यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आणि खूनाचा उलगडा झाला.

सविस्तर बातमी

12:50 (IST) 29 Nov 2022
बांधकाम साहित्य पुरवठ्यावरुन डोंबिवलीत तरुणांच्या दोन गटात हाणामारी

इमारतीच्या बांधकाम साहित्य पुरवठ्यावरुन डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव भागात रविवारी रात्री एका बांधकाम साहित्य पुरवठादाराला चार तरुणांनी मारहाण केली. चाकुने माने जवळ वार करुन गंभीर जखमी केले आहे. यामधील एक तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. यापुर्वी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने एका गुन्ह्यात त्याला फरार म्हणून जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा

12:37 (IST) 29 Nov 2022
"काश्मीर फाईल्स व्हल्गर आणि प्रचारकी", ज्युरींच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रया, म्हणाले...

इफ्फीचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी‘काश्मीर फाईल्स’या चित्रपटाला अश्लिल आणि प्रचारकी म्हटल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. लॅपिड यांच्या या विधानानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. असे असतानाच आता उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी लॅपिड यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर

12:21 (IST) 29 Nov 2022
ही ‘राज’नीती मुंबईत कशी जिंकणार?

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितल्याच्या काँग्रसेच्या आरोपाचा समाचार घेताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगाव येथील गट अध्यक्षांच्या मेळाव्यात, एखादी चांगली गोष्ट होणार असेल तर त्यासाठी खोट बोललं तरी ते वाईट नाही, हीच कृष्णनीती असल्याचे सगळ्यांना सांगितले. या वेळी त्यांनी पद्धतशीरपणे भाजप विरोधकांचा समाचारही घेतला. शिंदे-फडणवीस सरकार अथवा त्यांच्या वाचाळ मंत्र्यांनी राज्यपालांवर केवळ डोळे वटारण्यापलिकडे काही केले नाही. बातमी वाचा सविस्तर...

12:07 (IST) 29 Nov 2022
गोखले पूल हलक्या वाहनांसाठी सुरू होण्याची शक्यता धूसर

अंधेरीमधील गोखले पूल पादचारी, दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याबाबत आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय या दोन संस्थांनी सादर केलेल्या अहवालात तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी,  गोखले पूल पादचारी, दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याची शक्यता धूसर बनली आहे.

सविस्तर वाचा

12:05 (IST) 29 Nov 2022
“कर्नाटकची नाकेबंदी करण्याची जबरदस्त ताकद शिवसेनेत आहे, वेळ पडली तर…”; विनायक राऊतांचं विधान!

राज्यात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. यावरून विरोधकांकडून भाजपावर जोरदार टीका सुरू आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना(ठाकरे गट) नेते खासदार विनायक राऊत यांनी भाजपा आणि शिंदे सरकारवर टीका केली. वाचा सविस्तर बातमी...

12:05 (IST) 29 Nov 2022
मुंबई: एमसीएच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) उच्चस्तरीय समितीच्या सदस्यत्वाचा गैरवापर केल्याप्रकरणी माजी रणजीपटू किरण पोवार यांच्यावर एमसीए लोकायुक्तांनी एक वर्षाच्या बंदीची कारवाई केली होती. मात्र या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार देऊन पवार यांना दिलासा नाकारला. एमसीएच्या अखत्यारीत येणारे सर्व प्रशिक्षक हे एमसीएच्या उच्च स्तरीय समितीला उत्तरदायी असतात.

सविस्तर वाचा

11:59 (IST) 29 Nov 2022
महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं काम शिंदे सरकारच्या माध्यामातून भाजपा करत आहे – विनायक राऊत

राज्यात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. यावरून विरोधकांकडून भाजपावर जोरदार टीका सुरू आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना(ठाकरे गट) नेते खासदार विनायक राऊत यांनी भाजपा आणि शिंदे सरकारवर टीका केली. वाचा सविस्तर बातमी...

11:44 (IST) 29 Nov 2022
सावधान! रानटी हत्तींचे न्यू नागझिऱ्याच्या दिशेने कूच

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया आणि गोंदियातून भंडारा जिल्ह्यात आलेला सुमारे २३ रानटी हत्तींचा कळप आता कोका अभयारण्य, न्यू नागझिऱ्याच्या दिशेने कूच करीत आहे. राष्ट्रीय महामार्गापासून तीन किलोमीटर अंतरावर मोहघाटाच्या जंगलात सध्या त्यांचा मुक्काम आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:34 (IST) 29 Nov 2022
‘हॅलो, तुमच्यावर असलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर चर्चा सुरू आहे…’; खंडणीसाठी धवनकर कुलगुरू कक्षातून करायचे संपर्क

नागपूर : प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर हे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या कक्षात कथित लैंगिक छळाच्या तक्रारीवर चर्चा सुरू असल्याचे भासवून खंडणीसाठी संपर्क साधत असल्याची नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:33 (IST) 29 Nov 2022
माझा फोन उचलत का नाही, असे विचारत एकतर्फी प्रेमातून गुंडाचा तरुणीवर…

नागपूर : एकतर्फी प्रेमातून एका गुंडाने तरुणीचा छळ सुरू केला. फोनवर प्रतिसाद देत नसल्याने तो थेट तिच्या घरात घुसला. ठार मारण्याची धमकी देत अश्लील चाळे सुरू केले. बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. बातमी वाचा सविस्तर...

11:33 (IST) 29 Nov 2022
पुणे काँग्रेसची मरगळ कधी दूर होणार ?

महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतरही पुण्यातील काँग्रेस अद्याप सुस्तावलेल्या स्थितीतआहे. सहा महिने होत आले, तरी काँग्रेसला पूर्णवेळ शहराध्यक्ष नेमण्यासाठी वेळ मिळालेला नाही. सध्या प्रभारी शहराध्यक्षाच्या हाती कारभार असताना अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:32 (IST) 29 Nov 2022
इम्तियाज जलील : ध्रुवीकरणाच्या टोकावरचा नेता

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही. या अशा काही तरूण, आश्वासक पहिल्या पिढीच्या सर्व पक्षीय राजकारण्यांचा परिचय करून देणारी ही विशेष मालिका. बातमी वाचा सविस्तर...

11:32 (IST) 29 Nov 2022
‘नितीन गडकरी हे स्पायडर मॅन’; आसामचे कृषीमंत्री टागे टाकी

नागपूर : ॲग्रोव्हिजन प्रदर्शनीतील बीजारोपण, धान कापण्याची आधुनिक तंत्रे पाहून खूप प्रभावित झालो. आसाममधील पायाभुत सुविधांच्या अभावामुळे कृषीमध्ये आम्ही विकसित होऊ शकलो नाही. मात्र, गडकरींनी रस्त्यांच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने आता चांगली प्रगती होत आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:32 (IST) 29 Nov 2022
चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल, म्हणाल्या “असे कितीही आडवे आले तरी…”

उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या यात्रेदरम्यान त्या जाहीर सभेच्या माध्यमातून भाजपा आणि शिंदे गटावर सडकून टीका करत आहेत. सुषमा अंधारे यांच्या याच टीका-टिप्पणींवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे. आमची नक्कल करून त्या टाळ्या आणि शिट्ट्या मिळवतात. आमची नावे घेऊन त्यांचे दुकान चालत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. त्या नवी मुंबईमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. वाचा सविस्तर

Maharashtra Marathi Batmya

अंधेरीमधील गोखले पूल पादचारी, दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याबाबत आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय या दोन संस्थांनी सादर केलेल्या अहवालात तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी,  गोखले पूल पादचारी, दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याची शक्यता धूसर बनली आहे. मात्र या संदर्भात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Story img Loader