Marathi Batmya, 29 November 2022 : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन पुन्हा वाद सुरू झाला आहे. गोव्यात सुरू असलेल्या इंटरनॅशन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मध्ये ज्युरींनी या चित्रपटावर टीका केली आहे. ज्युरी हेड व इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांनी हा चित्रपट ‘व्हल्गर’ व ‘प्रोपगंडा’ असल्याचं म्हटलं. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा चिघळू लागला असून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही चालू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील गावांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे हे वातावरण तापलं असताना कर्नाटकने जतमधील ४० गावांवर दावा करण्याची तयारी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे यावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra Live News, 29 November 2022 : गोखले पूल हलक्या वाहनांसाठी सुरू होण्याची शक्यता धूसर
इफ्फीचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी‘काश्मीर फाईल्स’या चित्रपटाबाबत केलेल्या विधानावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या प्रकरणावर ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. लॅपिड यांनी या चित्रपटाला प्रचारकी आणि गलिच्छ म्हणत चांगलीच चपराक लावली आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत. वाचा सविस्तर
वाशीम : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, ही यात्रा जिल्ह्यातून जात नाही तोच काँग्रेसला जोरदार धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे एकेकाळचे मातब्बर नेते, माजी मंत्री अनंतराव देशमुख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बातमी वाचा सविस्तर…
अलिबाग: राजकारणात कधी कोण एकत्र येईल याचा नेम नसतो म्हणतात. याचाच प्रत्यय रायगडकरांना पुन्हा एकदा आला. अलिबाग तालुक्यातील नागाव येथे सुरू असलेल्या जिल्हा चाचणी कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने शेकाप आणि शिवसेना उध्दव ठाकरे गट एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. आगामी राजकीय समीकरणांची ही चाचपणी असल्याची चर्चा सुरू झाली. बातमी वाचा सविस्तर…
नागपूर: करोना काळात रखडलेल्या एसटी चालक, वाहकांच्या अंतिम पात्रता परीक्षेत उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे लोकसत्ताने पुढे आणले होते. एसटी महामंडळाच्या मुख्यालयाने या गंभीर प्रकरणाची दाखल घेत तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. बातमी वाचा सविस्तर…
नागपूर: पोलीस भरती प्रक्रियेमागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. सध्या पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी अखेरचा एक दिवस शिल्लक आहे. मात्र संकेतस्थळाच्या तांत्रिक त्रुटींमुळे उमेदवारांना नाहक त्रास होत आहे. अर्जासोबत लागणारे शुल्क ऑनलाईन भरल्यानंतरही अर्जासोबत ती जमा झालेले दिसत नाही. दुसरीकडे खात्यातून मात्र हे पैसे वजा होत आहेत. या सर्व गोंधळात अर्ज मात्र अपूर्ण राहत असल्याने चिंता वाढली आहे. सविस्तर वाचा –
लष्करात अधिकारी असल्याची बतावणी करुन एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुनीलकुमार मिना (वय २५, रा. कुंदनकुशलनगर, मानाजीबाग, बोपोडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सविस्तर वाचा –
अंधेरीमधील गोखले पूल पादचारी, दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याबाबत आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय या दोन संस्थांनी सादर केलेल्या अहवालात तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, गोखले पूल पादचारी, दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याची शक्यता धूसर बनली आहे. मात्र या संदर्भात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.