नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ८ जूनला राणा दाम्पत्याला चौकशीसाठी मुंबईत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणांवर दोषारोपपत्रही दाखल केले आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणीच मुंबई पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.

हनुमान चालिसा पठणाचे आव्हान

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
daughter cannot claim property if father dies before Hindu right of succession takes effect
हिंदू वारसा हक्क अंमलात येण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू, मुलीला मालमत्तेवर हक्क सांगता येणार नाही

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे आव्हान केले होते. त्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. मातोश्री निवास्थानाबाहेर शिवसैनिकांनी पहारा दिला होता. तसेच राणा दाम्पत्याच्या वांद्रेतील निवासस्थानाबाहेरही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते.

राणा दामपत्यावर गुन्हा दाखल
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याच्या कारणाखाली राणा दामपत्यावर मुंबई पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच दोघांनी पोलिसांना सहकार्य न करता उलट आरेरावी केली असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला होता. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना नोटीस बजावली आहे. येत्या ८ जूनला दोघांना वांद्रे न्यायलयात हजर रहावे लागणार आहे.