सांगली : मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथील एमडी उत्पादन करणार्‍या कारखान्यावर छापा टाकून १५० कोटींहून अधिक किंमतीचे एमडी अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी कारवाई सोमवारीही सुरूच असल्याने अधिकृत माहिती मात्र उशिरापर्यंत मिळू शकली नाही.

पुण्यातील गुन्हे अन्वेषण पथकाने सांगली पोलिसांच्या मदतीने पंधरा दिवसांपूर्वी कुपवाडमध्ये तीन ठिकाणी धाडी टाकून १४० किलो मेफड्रान हा अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. यावेळी तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुंबईतील गुन्हे शाखेला कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी या गावच्या शिवारात एमडी निर्माण करण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी छापा टाकण्यात आला.

Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
salman khan lawrence bishnoi
पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!
case registered against who sold clay pots by blocking road in kalyan
कल्याणमध्ये रस्ता अडवून मातीच्या कुंडी विकणाऱ्यावर गुन्हा दाखल
three crores found in atm van
नालासोपार्‍यात एटीएम व्हॅन मध्ये आढळले साडेतीन कोटी रुपये, गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

हेही वाचा – नीट, एमएचटी-सीईटी एकाच दिवशी, सीईटी सेलवर दोनच दिवसांत पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ!

पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, आत्माजी सावंत आणि आठ ते दहा कर्मचार्‍यांची या ठिकाणी रविवार रात्रीपासून कारवाई सुरू असून कारखान्याचा मालक अद्याप हाती आलेला नाही. या ठिकाणी तपास पथकाच्या हाती १०० किलोहून अधिक एमडी अमली पदार्थ लागला असून त्याची मोजदाद सुरू आहे. कारखाना कोण चालवते, कोण कामगार आहेत, तयार माल कुठे आणि कुणाला पुरवला जातो याबाबतची माहिती घेण्यात येत असून या माहितीची शहानिशा झाल्यानंतरच माध्यमांना अधिकृत माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले.

हेही वाचा – सोलापूर : माढ्यात भाजपचा उमेदवार बदलण्यासाठी शिवसेनेचाही दबाव

हेही वाचा – विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

दरम्यान, मिरजेतील डॉ. आंबेडकर उद्यानाजवळ गांजा विक्री करत असताना एका तरुणाला रविवारी अटक करण्यात आली. आशितोष देवकुळे (वय २३ रा. वरची गल्ली, तासगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून ७७ हजार ५०० रुपयांचा ३ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्याकडे असलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.